Yoga  sakal
लाइफस्टाइल

Yoga For Stress Relieve: स्ट्रेस, चिंता दूर करून मनाला शांती देतात हे योगासन,जाणून घ्या

स्ट्रेसची समस्या दूर होण्यास मदत करतील ही योगासने

Aishwarya Musale

तणाव ही आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे. तुम्ही आजूबाजूला नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तणावात आहे. हा तणाव घर-कुटुंब, व्यवसाय-नोकरी, नातेसंबंध, आरोग्य किंवा कशाशीही संबंधित असू शकतो.

योगाच्या मदतीने अनेक आजांतून आपल्याला मुक्ती मिळू शकते. त्याचा नियमित सराव केल्यास तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. कपालभारती आणि अनुलोम विलोमप्रमाणे भ्रामरी प्राणायम असते.

हा श्वासोच्छवासाचा सराव आहे. भ्रामरी प्राणायमच्या नियमित सरावाचे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. हा योगा तुम्ही ऑफिसमध्ये बसले असाल किंवा घरी बसले असाल तरीसुद्धा तुम्ही हा योगा करू शकता. चला तर या योगाचे फायदे जाणून घेऊया.

भ्रामरी प्राणायमचा मेंदूवर प्रभाव पडतो

भ्रामरी प्राणायम हा श्वासोच्छवासा सराव असून हा योगा केल्याने फ्रस्ट्रेशन, एंझायटी आणि राग दूर करण्यास मदत होते.

भ्रामरी प्राणायम करण्याचे फायदे

  • भ्रामरी प्राणायम केल्याने राग, चिंता आणि एंझायटीपासून आराम मिळतो.

  • जे लोक हायपरटेंशनने त्रस्त आहेत त्यांच्या मेंदूला हा प्राणायमच्या सरावाने आराम मिळतो.

  • मायग्रेनच्या त्रासातूनही तुम्हाला आराम मिळेल.

  • तुम्हाला तणावामुळे डोकेदुखीचा त्रास असेल तर हा योगा आवर्जून करा.

  • हाय ब्लड प्रेशर भ्रामरी प्राणायमच्या मदतीने कमी केले जाऊ शकते.

  • मेडिटेशन करण्यास अडथळे येत असतील तर सगळ्यात आधी भ्रामरी प्राणायम करा.

भ्रामरी प्राणायम करण्याची योग्य पद्धत

  • कुठल्याही शांत, हवेशीर वातावरणात बसा.

  • आता डोळे बंद करा.

  • दोन्ही हातांचे पहिले बोट आणि कान व गालाच्या मध्ये म्हणजेच कार्टिलेजवर ठेवा.

  • आता बोटांनी हलके दाबून तोंडातून मधमाशीसारखा आवाज काढा.

  • हा आवाज बंद तोंडातून निघेल.

  • १०-२० सेकंद आवाज काढल्यानंतर शांत व्हा आणि सामान्य अवस्थेत परत या.

  • भ्रामरी प्राणायम करताना या गोष्टींची काळजी घ्या

  • हे प्राणायम करताना बोटांना कानाच्या आत टाकू नका.

  • कार्टिलेज फार जोरात दाबण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे तुम्हाला पेन होऊ शकतं.

  • आवाज काढताना तोंड बंद ठेवा. चेहऱ्यावर प्रेशर टाकू नका.

बालासन

बालासन करताना व्यक्तीचे शरीर झोपलेल्या बाळासारखे असते. हे आसन केल्याने खांदे, पाठ आणि मानेचा ताण दूर होतो. हे आसन केल्याने मज्जासंस्था सुधारण्यासोबतच मानसिक विकारांपासूनही आराम मिळतो.

वृक्षासन

व्यक्तीचे शरीर वृक्षासन करताना झाडासारखे उभे असते. हे आसन करताना व्यक्तीचे दोन्ही हात वरच्या बाजूला आणि एक पाय गुडघ्याकडे वाकलेला असतो. हे योगासन केल्याने शरीर संतुलित ठेवण्याची शक्ती वाढते, ज्यामुळे मन शांत होण्यासोबतच व्यक्तीची एकाग्रताही वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT