लाइफस्टाइल

Health Care News : पोटात सतत गॅस आणि अपचन होत असेल तर हे पदार्थ कारणीभूत असू शकतात

पोट साफ न होण्यास कारणीभूत ठरतात हे पदार्थ...

Aishwarya Musale

सकाळी उठल्यानंतर पोट साफ झाले नाही तर संपूर्ण दिवसभर एकप्रकारची अस्वस्थतता जाणवते. कुठल्याही आजाराची सुरुवात पोटापासून होते असे म्हटले जाते. पोट साफ नसेल तर दुसऱ्या आजारांचीही लागण होते. बद्धकोष्ठतेचा जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना सामना करावा लागतो. बद्धकोष्ठतेच्या समस्येला तोंड देण्यासाठी लोक विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात पण तरीही यातून काहीच उपायोग होत नाही.

तूम्हालाही बद्धकोष्ठता त्रास नियमितपणे होत असेल. तर ते पाचन तंत्रासाठी खूप हानिकारक असू शकते. यामुळे तुम्ही कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि त्यामुळे तुमच्या संपूर्ण लाईफस्टाईलवर परिणाम होऊ शकतो. याची अनेक कारणे आहेत.

पण, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हानिकारक अन्नपदार्थांचे सेवन होय. नियमित आहारात काही पदार्थ वापरले जातात जे अन्न बद्धकोष्ठता निर्माण करतात जे बद्धकोष्ठता वाढवतात.

दुध आणि दुधाचे पदार्थ

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे बद्धकोष्ठता वाढविणारे पदार्थ आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या सर्व्हेनुसार, मुलांना बद्धकोष्ठतेचा धोका जास्त असतो. कारण लहान मुलांची पचनसंस्था गाईच्या दुधात असलेली प्रथिने पचवण्यास पूर्णपणे सक्षम नसते.

व्हाईट ब्रेड

व्हाईट ब्रेडचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यामुळे शौच कोरडे आणि कडक होते. त्यामुळे पोट साफ होण्यास त्रास होतो. ते बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मैद्यात फायबरचे प्रमाण खूपच कमी असते. हे पचनासाठी चांगले नाही.

रेड मीट

रेड मीटमध्ये फायबरचे प्रमाण खूपच कमी असते. अशावेळी बद्धकोष्ठतेचा धोका असतो. जर तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात फायबरयुक्त हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये आणि तृणधान्ये याऐवजी मांस खाल्ले तर तुमच्या शरीरातील फायबरचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT