सध्या मोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहान मुलं देखील मोबाईल फोनच्या आहारी जाऊ लागली आहेत. अगदी लहान वयात त्यांच्या हातात मोबाईल, टीव्ही सारखे आधुनिक उपकरण आल्याने याचा त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होताना दिसतात. अनेक घरातील लहान मुलं मोबाईल फोन पाहिल्याशिवाय नीट जेवत देखील नाहीत.
मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम व्हायला सुरूवात होते. अभ्यासात लक्ष नसणे, आई-बाबा काय सांगतातयत ते ऐकण्यापेक्षा मोबाईलवरच जास्त वेळ घालवणे त्यांना आवडते. अशावेळी पालकांना मुलांची ही सवय कशी सोडवावी ते कळतं नाही. अशावेळी मुलांच्या मोबाईलची सवय सोडवण्यासाठी पालकांनीच काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी ते खालीप्रमाणे कृती करू शकतात.
कमी वयात मोबाईल देऊ नका- लहान वयात वेळ घालवण्यासाठी पालक मुलांना मोबाईल देतात. पण असे करू नका. त्यांना भरपूर खेळणी खेळायला द्या. अगदीच वाटलं कर टिव्हीवरचे कार्टून बघू द्या. पण त्यासाठीही योग्य वेळ ठरवा.
वायफाय बंद ठेवा- जेव्हा तुमचे काम पूर्ण होईल तेव्हा तुम्ही इंटरनेट किंवा वायफाय बंद ठेवा. असे केल्यामुळे मुले सतत इंटरनेट पाहणार नाहीत आणि मोबाईलचा वापर कमी होईल.
मुलांना क्वालिटी टाईम द्या- घरातले वातावरण चांगले राहील यासाठी प्रयत्न करा. तुम्ही एकमेकांबरोबर क्वालिटी टाईम घालवा. एकमेकांची मस्करी करा, खेळा, मस्ती करा. मजेदार गोष्टी करा. त्यात तुमचा मुलगा गुंतून राहील. मुलांना यात गुंतवले की ते आणखी पर्याय शोधतील. तसेच मोबाईलपासूनही दूर राहतील.
स्क्रीन टाईमवर मर्यादा- छोट्या मुलांसाठी दिवसातले २ ते ३ तास स्क्रीन टाईम लिमिटेशन आखून द्या. तर टीनएजर्ससाठी ४ ते ५ तासांचा वेळ द्या. या ४ ते ५ तासात ही मुले मोबाईलवरून अभ्यास करतील असे पाहा. असे केल्याने इंटरनेटरचा अधिक चांगला वापर करता येईल. तसेच आरोग्यावरही परिणाम होणार नाही.
मोबाईल पासवर्ड बदला- घरातल्या मोठ्यांनी आपला पासवर्ड बदलत राहा. त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय मुलांना मोबाईल वापरता येणार नाही.
घराबाहेरील कामात ठेवा व्यस्त- वाढत्या वयाच्या मुलांना घराबाहेरील कामं करण्याची सवय लावा. जर तुमचा मुलाला सतच मोबाईल बघायला लागला तर त्याला प्रेमाने तुमच्यासाठी मदत करायला सांगा. तुम्ही मुलांना घर स्वच्छ करण्यासाठी, सजवण्यासाठी, नाश्ता तयार करण्यासाठी, एखाद्याला मदत करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलं जितकी जास्त बिझी असतील तितका मोबाईलचा वापर कमी करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.