Vitamin B12 rich foods Esakal
लाइफस्टाइल

Vitamin B 12 असलेले हे पदार्थ खा आणि आजारांना दूर पळवा

Kirti Wadkar

Vitamin B12 rich foods: शरीरामध्ये सर्व विटामिन्स Vitamins असणं गरजेचं आहे. काही विटामिन शरीर स्वत: तयार करतात. तर काही विटामिन्ससाठी आहारामध्ये विशेष पदार्थांचा समावेश करणं गरजेचं असतं. शरीरासाठी आवश्यक असलेलं एक विटामिन म्हणजे Vitamin B 12. Marathi Health Tips Increase B 12 level in your body through proper diet

शरीरामध्ये विटामिन बी १२ Vitamin B 12 ची करमतरचा निर्माण झाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होवू शकतात. शरीरातील पेशींसाठी तसचं नसा आणि डीएनएसाठी विटामिन बी १२ हे अत्यंत गरजेचं आहे.

शरीरात Vitamin B12 ची कमतरता निर्माण झाल्यास ब्लड डिफिशियंसी Blood Deficiency म्हणजेच एनिमियाचा धोका वाढू शकतो. लाल रक्तपेशींसाठी विटामिन बी १२ अत्यंत गरजेचं आहे.

डाएट चार्टनुसार पुरुषांना दररोज २.४ mcg आणि महिलांना 2.6 mcg विटामिन बी १२ चं सेवन करणं गरजेचं असतं. यासाठीच आहारामध्ये विटामिन बी १२ चा समावेश करणं गरजेचं आहे.

विटामिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणं

शरीरामध्ये विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यास काही लक्षणं दिसू लागतात. यामध्ये थकवा जाणवणं, तसचं हाता पायांमध्ये मुंग्या येणं किंना सुन्न पडणं, धुसर दिसणं, खूप जास्त घाम येणं, वारंवार तोंड येणं याचसोबत ताप आणि बद्धकोष्ठता अशी काही लक्षणं दिसून येतात.

विटामिन बी १२ साठी या पदार्थांचं करा सेवन

मासे- मासे हे विटामिन बी १२ चं मुख्य स्त्रोत आहेत. रावस, कोळंबी, कुपा या माश्यांसोबतच खेकडे, शिंपले यांमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन बी १२ आढळतं. त्यामुळे जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुमच्या आहारामध्ये सीफूडचा नक्की समावेश करा.

त्याचप्रमाणे रेड मीट म्हणजेच लाल मासांमध्येही Vitamin B12 मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं.

हे देखिल वाचा-

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ- शाहाकारींसाठी विटामिन बी १२साठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन हा एक उत्तम पर्याय आहे. दूधामध्ये पुरेश्या प्रमाणात विटामिन १२ आढळतं. शिवाय यात शरिरासाठी आवश्यक असलेले प्रोटीन, कॅल्शियम आणि विटामिन डी सारखी पोषक तत्व देखील उपलब्ध असतात.

दुधासोबतच तुम्ही आहारामध्ये दही Curd आणि पनीर यांचादेखीस समावेश करू शकता. यामुळे तुमच्या शरीराची विटामिन बी १२ ची गरज पूर्ण होईल.

अंड- उकडलेल्या एका अंड्यामध्ये ०.६ मायक्रोग्राम विटामिन बी १२ उपलब्ध असतं. म्हणजेच जर तुम्ही दररोज एक अंड खाल्लं तर तुमच्या गरजेच्या २५ टक्के विटामिन बी १२ तुम्हाच्या शरीराला मिळू शकतं.

खास करून अंड्याच्या बलकामध्ये Vitamin B12 आढळतं. यासाठी सकाळी नाश्त्यामध्ये उकडलेल्या अंड्याचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं

टोफू- अलिकडे भारतातही विविध पदार्थांमध्ये खास करून सलाडमध्ये टोफूचा वापर वाढू लागला आहे. टोफू हे सोयामिल्क पासून तयार केलेलं एक प्रकारचं पनीर आहे.

यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन बी१२ उपलब्ध असतं. त्याचसोबत प्रोटीन, झिंक, आयरन, कॅल्शियम आणि सेलेनियम ही पोषक तत्व देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

बीट- बीट हे आयर्नचा स्त्रोत असल्याचं अनेकांना माहित आहे. मात्र यामध्ये विटामिन बी १२ देखील उपलब्ध असल्याने बीटाचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. बीटाच्या सेवनामुळे रक्ताभिसरण चांगलं होण्यास मदत होते. बीट ज्यूस किंवा सलाडच्या रुपात तुम्ही बीटाचा आहारामध्ये समावेश करू शकता.

फोर्टिफाइड फूड- शरीरालाल असलेली विटामिन्सची गरज पूर्ण करण्यासाठीच अलिकडे बाजारात फोर्टिफाइड फूड मिळू लागले आहे. यामध्ये अगदी गहू, तांदूळ, तेल मीठ, दूध उपलब्ध असतं.

या पदार्थांच्या पॅकिंगवर +F हे चिन्ह पाहायला मिळतं. या पदार्थांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले विटामिन्स आणि मिनरल्स मिसळण्यात आलेली असतात.

या पदार्थांसोबतच तुम्ही आहारामध्ये केळं, सफरचंद आणि बेरिज अशा विटामिन बी१२ ने समृद्ध असलेल्या फळांचा देखील समावेश करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atishi Marlena: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांचं नाव जाहीर होताच स्वाती मालिवाल भडकल्या; म्हणाल्या, डमी...

Ganesh Visarjan 2024 LIVE: मानाचे पाचही गणपती विसर्जन मिरवणुकीत झाले सहभागी

Jio Network Outage in Mumbai : मुंबईत जिओ नेटवर्क ठप्प; लाखो ग्राहक झाले हैराण,कारण अद्याप अस्पष्ट

Upcoming Bollywood Movie : महाराजनंतर आमिरचा लेक जुनैदचा श्रीदेवीच्या लेकीबरोबर रोमान्स ; जाणून घ्या आगामी सिनेमाचे अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : दिल्लीच्या आप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर आतिशी यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT