लाइफस्टाइल

Flight Anxiety: फ्लाइटमध्ये प्रवास करताना तुम्हालाही भीती वाटते का? या टिप्स येतील कामी!

फ्लाइट अँक्झायटी कशी दूर करावी? जाणून घ्या

Aishwarya Musale

तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. आता दोन दिवसांचा प्रवास 2 तासांत पूर्ण करता येणार आहे. होय, विमान हे एक असे साधन आहे ज्याद्वारे तुम्ही लांबचा प्रवास पटकन करू शकता. पण विमानात प्रवास प्रत्येकालाच जमेल असं नाही.

असे अनेक प्रवासी आहेत ज्यांना विमानात चढताच अस्वस्थ वाटू लागते. अनेक वेळा लोक खूप घाबरतात. लोक पूर्ण प्रवासात अस्वस्थ आणि तणावात राहतात. जर तुम्हालाही फ्लाइटमध्ये प्रवास करताना कोणत्याही प्रकारची चिंता किंवा तणाव जाणवत असेल तर आम्ही तुम्हाला तज्ञांनी सुचवलेले काही उपाय सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही या काळात आराम करू शकाल.

फ्लाइट अँक्झायटी कशी दूर करावी?

या समस्येचा सामना करण्यासाठी तज्ज्ञ दोन प्रकारचे व्यायाम करण्याचा सल्ला देतात. हा व्यायाम तुम्ही तुमच्या सीटवर बसून करू शकता. ते कोणते व्यायाम आहेत ते जाणून घेऊया.

हार्ट ओपनर एक्सरसाइज

  • हे करण्यासाठी, तुमचे दोन्ही हात तुमच्या सीटच्या आर्म रेस्टवर ठेवा.

  • आता आपली छाती शक्य होईल तेवढी पुश करा.

  • आपले डोके मागे वाकवा.

  • आता या स्थितीत, काउंट करत 5 वेळा श्वास घ्या.

  • आता आपले आर्म पुढे करा आणि स्वतःला मिठी मारा.

  • या वेळी तुमचे डोके खाली वाकलेले असावे.

  • हे आसन केल्याने तुम्हाला खूप आराम वाटेल.

भ्रामरी प्राणायाम

  • हे करण्यासाठी, तुम्ही ज्या स्थितीत बसला आहात त्याच स्थितीत बसून राहा आणि नाकातून दीर्घ श्वास घ्या.

  • श्वास सोडताना हमममम... असा आवाज करा.

  • या दरम्यान शक्य तितक्या हळू श्वास सोडा आणि हमम... असा आवाज काढत रहा.

  • यामुळे तुम्हाला खूप आराम वाटू शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • तुमचा सीट बेल्ट बांधून ठेवा.

  • तुम्हाला चिंता वाटत असल्यास, क्रू मेंबरला कळवा.

  • पुस्तके वाचा.

  • स्वतःचे लक्ष विचलित करण्यासाठी म्युझिक ऐका किंवा चित्रपट पहा.

  • तुमच्यासोबत कोणी प्रवास करत असेल तर त्यांच्याशी बोलून स्वतःचे लक्ष विचलित करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT