Happy Life  Sakal
लाइफस्टाइल

Happy Life : तुम्हालाही तणाणमुक्त जगायचं? फॉलो करा 91 टक्के लोकांचा फॉर्मुला

आज अनेक कुटुंबातील संवाद थांबल्याने अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Happy Life Formula : नेहमी आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांमध्ये डिनर थेरपीची प्रथा झपाट्याने वाढत असून, कौटुंबिक तणाव कमी करण्यासाठी हे सूत्र अतिशय फायदेशीर मानले जात आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार 91% पालकांचा असा विश्वास आहे की, कुटुंबासह एकत्र जेवण केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.

84% लोकांना आहे प्रिय व्यक्तीसोबत जेवण करण्याची इच्छा

वेकफिल्ड रिसर्चने हेल्दी फॉर गुड अंतर्गत 1,000 अमेरिकन प्रौढांचे सर्वेक्षण केले. त्यात असे आढळून आले की 84% लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीसोबत शक्य तितक्यावेळा एकत्र बसून काही तरी खाण्याची सुप्त इच्छा आहे. याचे मुख्य कारण म्हमजे सरासरी प्रौढ व्यक्ती जवळजवळ दिवसातील अर्धा वेळ एकटाच खातो हे या इच्छे मागचे मुख्य कारण आहे.

इतरांसोबत खाल्ल्याने तणाव कमी होतो

संशोधकांचे म्हणणे आहे की, सततच्या तणावामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनचे प्रोफेसर एरिन मिकोस, जॉन्स हॉपकिन्स यांनी सांगितले की,इतरांसोबत जेवण केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते तसेच स्वाभिमान वाढण्यास मदत होते.

इतरासोबत जेवण करणे हा एक सामाजिक संवाद सुधारण्याचा चांगला मार्ग असून, विशेषतः मुलांसाठी हे अतिशय महत्वाचे आहे. यामुळे मित्र, कुटुंब, सहकारी आणि शेजारी यांच्याशी नाते अधिक दृढ होण्यास मदत होते.

व्हिडिओ कॉलद्वारे करा एकत्र जेवण

आज अनेकजण कामानिमित्त विविध शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. यामुळे अनेकदा एकत्र जेवण करणे शक्य होत नाही. त्यामुळे जर, तुम्ही बाहेरगावी रहात असाल तर, तुम्ही तणाव कमी करण्यासाठी तुमच्या प्रियजनांसोबत संध्याकाळचे जेवण व्हिडिओ कॉलद्वारे एकत्र करू शकता. असे केल्याने विविध विषयांवर गप्पागोष्टी होऊन दिवसभराचा ताण कमी होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

BJP Seat Sharing : भाजपनं छोट्या भावांचं मन राखलं! आपल्या कोट्यातून 'या' दिल्या जागा

Sambhaji nagar Central: किशनचंद तनवाणी यांनी तिकीट परत का केलं? शिवसेना प्रवेशांच्या चर्चांवर दिलं थेट उत्तर

Latest Maharashtra News Updates : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्ष स्थापन

SCROLL FOR NEXT