AICTE Pragati Scholarship sakal
लाइफस्टाइल

व्यावसायिक अभ्यासक्रमात ‘प्रगती’ साधण्यासाठी...

सकाळ वृत्तसेवा

तुम्ही अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता असणारा कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम करत असला तर तुमची ‘प्रगती’ निश्चित आहे. होय, परिषदेच्या वतीने मुलींच्या शिक्षणासाठी ‘प्रगती शिष्यवृत्ती’ योजना लागू करण्यात आली आहे.

‘प्रगती शिष्यवृत्ती’ योजना ही एआयसीटीईने लागू केलेली सरकारी योजना आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत तंत्रशिक्षण घेण्यासाठी मुलींना दरवर्षी एकूण पाच हजार शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते. शिष्यवृत्ती विजेत्यांना दरवर्षी ५० हजार रुपये शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. या योजनेच्या माहितीसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता निकष

  • प्रगती शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी, महिला उमेदवारांनी एआयसीटीई-मंजूर महाविद्यालय/संस्थेत शिकत असणे आवश्यक आहे.

  • अर्जदारांना राज्य/केंद्र सरकारच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेद्वारे चालू शैक्षणिक वर्षात एआयसीटीई- मान्यताप्राप्त महाविद्यालय/संस्थेच्या तांत्रिक डिप्लोमा/ पदवी कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षी किंवा द्वितीय वर्षात प्रवेश देणे आवश्यक आहे.

  • प्रति कुटुंब दोन मुली या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

  • अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मागील आर्थिक वर्षात आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

  • दहावीची मार्कशीट/ बारावीची गुणपत्रिका

  • आधार कार्ड, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो

  • उमेदवाराची स्वाक्षरी

  • तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले मागील आर्थिक वर्षाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र

  • चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष पदवी/डिप्लोमा कार्यक्रमांना केंद्रीकृत प्रवेश प्राधिकरणाने दिलेले प्रवेशपत्र

  • चालू शैक्षणिक वर्षासाठी सशुल्क शिक्षण शुल्काची पावती

  • अर्जदाराचे नाव, खाते क्रमांक

  • दिलेल्या नमुन्यानुसार संचालक/प्राचार्य/विभागप्रमुख यांचे प्रमाणपत्र

  • अर्जदार प्रवर्गासाठी अर्ज करत असल्यास जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत

(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT