लाइफस्टाइल

Health Care News : बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी ही पाने चावा, लवकरच मिळेल आराम

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी ही पाने चावा...

Aishwarya Musale

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये कढीपत्ता अगदी सहजासहजी आढळतो. कढीपत्त्याच्या फोडणीमुळे डाळी तसंच भाज्यांची चव अधिक रूचकर होते. पण आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे देखील आहेत. वजन कमी करणे आणि हृदयाच्या आरोग्याला चालना देण्यापासून ते सकाळी जाणवणारा थकवा आणि जंतूच्या संसर्गाशी लढा देण्यापर्यंत त्याच्या फायद्यांची यादी मोठी आहे.

पण हे पोटासाठी किती चांगले आहे हे तुम्हाला माहिती आहे का? होय, यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे तुमची पचनशक्ती सुधारू शकतात आणि तुम्हाला ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देतात. जर तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रिकाम्या पोटी हे पान चावून खाल्ल्याने फायदा होऊ शकतो.

कढीपत्ता बद्धकोष्ठतेसाठी चांगला आहे का?

बद्धकोष्ठतेचा जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना सामना करावा लागतो. बदलती जीवनपद्धती, चुकीच्या जेवणाच्या सवयी, सकस आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव आदी विविध कारणांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागत असतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात कढीपत्त्याचा समावेश करू शकता. कढीपत्त्यात लेक्सेटीव्ह प्रॉपर्टीज असतात आणि त्यात काही डाइजेस्टिव एन्झाईम्स देखील असतात ज्यामुळे आतड्यांची हालचाल वाढते.

यामध्ये फायबर देखील असते जे पचनक्रिया सुधारते. या व्यतिरिक्त या पानात कार्मिनेटिव गुणधर्म असतात जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात. कढीपत्त्याचा थंड प्रभाव असतो ज्यामुळे पोट थंड होते आणि जळजळ आणि पेटके यापासून आराम मिळतो.

कढीपत्त्याचे असे सेवन करा

  • तुम्ही दररोज 7 ते 8 कढीपत्त्याची पाने रिकाम्या पोटी चावू शकता.

  • याशिवाय 8 किंवा 10 कढीपत्ता स्वच्छ करून पाण्यात उकळून या पाण्याचे सेवन करा. बद्धकोष्ठतेच्या समस्येवरही हे फायदेशीर ठरू शकते.

  • कढीपत्त्याची चटणी खाल्ल्यानेही खूप फायदा होतो.

  • कढीपत्त्याचा रसही पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT