kitchen Hacks  esakal
लाइफस्टाइल

kitchen Hacks : रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध करण्यासाठी कारली खा, कडूपणा घालवण्यासाठी वापरा ही ट्रिक

चला तर कारले आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहेत ते जाणून घेऊयात.

साक्षी राऊत

kitchen Hacks : कारले आपल्या आरोग्यासाठी फार चांगले असते. कारल्यास नॅचरल ब्लड प्यूरिफायरसुद्धा म्हटले जाते. आयुर्वेदातसुद्धा कारल्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. मात्र कारले कडू असल्याने बहुतेक लोक कारले खात नाहीत. मास्टर शेफ संजीव कुमारने अलीकडेच कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स सांगतिल्या आहेत. चला तर कारले आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहेत ते जाणून घेऊयात.

कारले खाण्याचे फायदे

१) रक्तास प्यूरीफाय करते कारलं

कारल्यास बेस्ट ब्लड प्यूरीफायर मानल्या जाते. यात व्हिटॅमि सीचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. यात अँटीऑक्सिडंट्स तत्व आढळून येतात जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

२) मधुमेहावर रामबाण उपाय

कारल्यात आढळणारे केरॅटिन एलिमेंट शरीरातील ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करते. शिवाय कारल्यात पॉलीपेप्टाइडसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. जे इन्सुलिनप्रमाणे शरीरातील वाढलेली ब्लड शुगर कंट्रोल करण्याचे काम करते.

३) ब्लड प्रेशरसाठीही फायदेशीर

कारल्यात असणारे पोटॅशियम शरीरातील ब्लड प्रेशर कंट्रोल करते. एवढेच नाही तर कारले खाल्ल्याने न्यूरोट्रांसमिशनची प्रक्रिया सुधारण्यासही मदत होते. म्हणून कारले आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (Lifestyle)

कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी ट्राय करा या ट्रिक्स

  • कारल्यात काही वेळ मीठ घालून ठेवा

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले कापून त्यावर मीठा घाला. १५-२० मिनिटांनंतर मिठामुळे कारल्याला सुटलेले पाणी काढून टाका. बऱ्या प्रमाणात कडूपणा कमी झालेला असेल.

कारले तळण्याआधी मध किंवा साखरेच्या पाण्यात घाला

कारले तळण्याआधी कुठल्याही पातेल्यात गरजेप्रमाणे मध किंवा साखर घालून त्यात कारले टाका. यानंतर कारले तळून खाल्ल्यास त्याचा कडूपणा साखरेमुळे कमी झालेला असेल.

  • कारले दह्यात घाला

कारल्यांचा कडूपणा कमी करण्यासाठी काही वेळ कारले दह्यामध्ये घालून ठेवा. काही वेळानंतर कारले पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कारल्याची भाजी बनवल्यास त्याचा तिखटपणा आणि कडूपणा कमी होईल.

  • कारल्यास नारळ पाण्यात मॅरीनेट करा

नारळ पाण्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही कारल्याचा कडूपणा कमी करू शकता. नारळ पाण्यात कारले १५-२० मिनिटे मॅरिनेट करण्यासाठी घाला. काही वेळानंतर कारले चांगल्याप्रकारे धुवून घ्या. आणि मग भाजीसाठी वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT