Tongue Cleaning  esakal
लाइफस्टाइल

Tongue Cleaning : फक्त दात घासले म्हणजे तोंडाची स्वच्छता झाली असं नाही, जिभेची स्वच्छता करण्यासाठी वापरा या ट्रिक्स

Mouth Cleaning Home Remedies : दातांची स्वच्छता झाली म्हणजे जीभ ही स्वच्छ झाली असं नाही. तर जीभेची स्वच्छता करणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

Tongue Cleaning :

आपल्या शरीरातील सर्व अवयवांना स्वच्छ ठेवण्याची गरज असते. कारण या अवयवांच्या स्वच्छतेमुळेच आपल्या आरोग्य निर्भर असते. आता आपण मुखशुद्धी करतो किंवा तोंडाची स्वच्छता करतो. तेव्हा फक्त दातांचा विचार करतो जिभेचा विचार फारच कोणी करत नाही.

पण जिभेलाही स्वच्छतेची गरज असते. याबद्दल कोणी फारसं बोलतही नाही. आपण जे पदार्थ खातो त्याची चव आपल्याला योग्य प्रकारे जाणून देणारी आपली जी स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही दातांच्या स्वच्छतेसाठी दिवसातून दोन ते तीन वेळा ब्रश करत असाल. पण जिभेच्या स्वच्छतेसाठी आजवर काय केले याचा विचार नक्की करा.

दातांची स्वच्छता झाली म्हणजे जीभ ही स्वच्छ झाली असं नाही. तर जीभेची स्वच्छता करणे गरजेचे आहे. कारण जीभ स्वच्छ न केल्याने अनेक आजारांच्या सामना आपल्याला करावा लागू शकतो.

आपल्या जिभेला स्वच्छतेची गरज आहे कसे ओळखावे?

  • तुमची जीभ जर पांढरी पडली असेल तर ती घाण आहे असे समजावे.

  • जर तुमची जीभ मऊ पडली असेल तर त्यामध्ये न्यूट्रिशन्स आणि पोषक तत्वांची कमी आहे.

  • जर जिभेवर पांढऱ्या रंगाचा थर दिसत असेल आण तिला चिरा पडल्या असतील तर जीभ घाण आहे असे समजावे.

  • आपले पोट बिघडल्यानंतर सुद्धा आपल्या जीभेवर त्याचा परिणाम दिसतो.

  • तोंडातून घाण वास येत असेल तर त्याचे कारण दातच नाही तर जीभ सुद्धा असू शकते.

  • डॉक्टर सांगतात की तुमची जर किडनी खराब असेल तरीसुद्धा जिभेवर परिणाम दिसतो. जीभ घाणेरडे दिसू लागते आणि त्यावर पांढरा थर जमा होऊ लागतो.

  • मधुमेहासारखा गंभीर आजार जर तुमच्या हाताबाहेर गेला असेल तरी देखील याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो आणि जिभेवरही त्याचा परिणाम दिसतो.

किती वेळा जीभ साफ करणं आहे गरजेचं ?

दिवसातून दोन वेळा तुम्ही दात घासत असाल तर दोन्ही वेळा तुम्ही जीभ ही स्वच्छ केली पाहिजे. तुम्ही सकाळ संध्याकाळ जर ही गोष्ट पाळलीत तर तुमच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होते.

जीभ स्वच्छ करण्याचे टेक्निक कोणती ?

जिभेला सोप्या मार्गाने स्वच्छ करण्याचे टेक्निक म्हणजे बाजारात उपलब्ध असलेले टंग क्लीनर वापरणे. बाजारात प्लास्टिक, तांबे आणि स्टील अशा दोन्ही प्रकारचे क्लीनर उपलब्ध आहेत. त्यापैकी तुम्ही कोणाचाही वापर करू शकता.

डॉक्टर असं सांगतात की जर तुम्ही तांब्याचा क्लिनर वापरला तर त्यामुळे जीभेची स्वच्छता अधिक चांगली होते. आणि याचा आपल्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.  

हळद आणि लिंबू स्वच्छ करा जीभ

हळद आणि लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे आपल्या शरीराला स्वच्छ करण्याचे काम करतात. हेच पदार्थ तुमच्या जिभेलाही चकचकीत बनवणार आहेत. हळद आणि लिंबू एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. आणि जिभेवरती दहा मिनिटे ठेवा. यानंतर तुम्ही चूळ भरून जिभ स्वच्छ करू शकता यामुळे जिभेवरची सर्व मृत त्वचा निघून जाईल.

तुरटी आणि मीठ

तुरटी मुळातच घाणेरडे पदार्थ पाणी स्वच्छ करण्यासाठी, पाणी नितळ बनवण्यासाठी वापरतात. आजही ग्रामीण भागात गढूळ पाणी आल्यानंतर त्याच्यावर तुरटी फिरवून मग त्याचा वापर केला जातो. तुरटी तुमच्या जिभेची स्वच्छता करण्यातही तुमच्या कामी येणार आहे. तुरटी आणि मिठाचा वापर करून तुम्ही जीभ चकचकीत आणि आरोग्यदायी बनवू शकता.

तुरटी आणि मिठाची एक पेस्ट बनवून ती हलक्या हातांनी तुमच्या जिभेवर चोळावी. आणि त्यानंतर लगेचच चूळ भरावे या सोप्या उपायाने तुमची जीभ स्वच्छ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT