Tourism Destination esakal
लाइफस्टाइल

Tourism Destination : 35 हजार तुम्हाला करोडपती बनवतील, कोणती Investment Scheme नाहीतर आहे बेस्ट टूर प्लॅन

या देशात गेल्यावर तुम्हाला 8760000 व्हिएतनामी डोंग मिळतात

Pooja Karande-Kadam

Tourism Destination :

तुमच्या अकाऊंटला असलेले काही पैसे कुठेही न गुंतवता करोडो रूपयात बदलण्याची ही भन्नाट आयडिया आहे. हेडींग वाचून तुम्हीही बुचकळ्यात पडला असाल की ही काय भानगड आहे. तुमच्या अकाऊंटवर असलेले ३५ हजार तुम्हाला करोडपती कसे बनवतील. हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याच उत्तर पाहुयात.

जगातील प्रत्येक देशाचे स्वतःचे चलन आहे. त्याचा वापर करून, लोक त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी खरेदी करण्यास सक्षम आहेत. लोक त्यांचे आयुष्य कसे घालवतात हे त्यांच्या कमाईवर अवलंबून असते. प्रत्येक देशाचे चलन वेगळे असते. भारतात वस्तू खरेदी करण्यासाठी रुपयाचा वापर केला जातो.

त्याचप्रमाणे अमेरिकेत डॉलर प्रचलित आहे आणि यूकेमध्ये युरो प्रचलित आहे. जगातील विविध देशांमध्ये विविध चलने वापरली जातात. यासोबतच भारतातील एक रुपयाचे मूल्यही प्रत्येक देशात बदलते.

 या चलनांचा आणि आपल्या प्लॅनचा काय संबंध असा विचार तुम्हीही करत असाल. तर, हा प्लॅन चलनाचाच आहे. भारतात रूपया आहे तसा इतर देशांचेही चलन वेगवेगळे आहे. अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर तिथे एक रुपयाची किंमत खूपच कमी आहे. पण जगात असे काही देश आहेत जिथे तुमच्या एक रुपयाची किंमत खूप जास्त आहे.

अशा देशांमध्ये, तुम्हाला त्यांच्या चलनात रूपयाऐवजी खूप जास्त रक्कम मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगणार आहोत जिथे भारतातील कोणताही मध्यमवर्गीय माणूस गेल्यावर करोडपती होऊ शकतो.

अफाट निसर्गसौंदर्य असलेला हा देश आहे

व्हिएतनाम

व्हिएतनामला जाण्यासाठी भारतातून थेट विमानाने चार तास लागतात. आज अनेक भारतीय सुट्टीसाठी या देशात जातात. तेथील स्थानिकांचे भारतासोबतचे संबंध खूप चांगले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की व्हिएतनाम अमेरिकेशी युद्ध जिंकल्यानंतर प्रसिद्धीझोतात आले.

व्हिएतनामने 1975 पर्यंत चाललेले युद्ध जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेचे सुमारे 58 हजार सैनिक मारून जिंकले होते. जर आपण व्हिएतनामच्या वैशिष्ट्याबद्दल बोललो, तर हा देश जगातील कॉफी उत्पादक देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तिथे काय पहाल?

दक्षिण चीन समुद्रातील ‘हा लाँग बे’ हे युनेस्को प्रमाणित जगप्रसिद्ध ठिकाण व्हिएतनाममध्ये आहे. तिथे जवळपास २००० डोंगरांची शिखरं समुद्रात दिसतात. या शिखरांमधून बोटीने फिरता येतं. तसंच आजूबाजूला निळं-हिरवं पाणी आणि त्यातली ही शिखरं पाहत आपण हाऊ सबोटवर राहू शकतो.

डोंगरातील कल्पनातीत मोठय़ा गुंफा, कयाकिंग, ‘टी टॉप’ आयलंडवरील व्ह्य़ू पॉइंट, पर्ल फार्म अशा बऱ्याच गोष्टी एन्जॉय करता येतात. उत्तरेला चीनच्या सीमेजवळ असलेला ‘सा पा’ डोंगर हे आणखी एक सुंदर ठिकाण आहे. तिथे आदिवासी जमाती राहतात.

भारतीय आणि व्हिएतनामी चलन

तुमच्याकडे 30 हजार रुपये असले तरी, तुम्ही येथे पोहोचताच तुम्हाला सुमारे 8760000 व्हिएतनामी डोंग (चलन) मिळतील. हे भारतीय पैशात करोडो रूपये आहेत. त्यामुळे तुम्हाला ३५ हजारात करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही इथे फिरायला जाण्याचा नक्कीच विचार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT