पुण्यातील एका उच्चभ्रू कंपनीत सीए पदावर असणाऱ्या तरुणीचे निधन झाले आहे. संबंधित तरुणी मूळची केरळची असून तिच्या आईने कंपनीतील टॉक्सिक वातावरणामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहेत.
आयटी कंपन्यांमध्ये वाढणारे हे प्रदूषण कर्मचाऱ्यांच्या थेट मानसिक ताणावरती परिणाम करणारे ठरत आहे. २४ तासांमध्ये आठ ते दहा तास ज्या ठिकाणी आपण राहतो ते ठिकाण आपल्यासाठी योग्य नसेल तर त्याचा आपल्या आरोग्यावरती आणि मनावरती नकारात्मक परिणाम होतो. केरळच्या या तरुणीचा मृत्यू याचे एक उदाहरण म्हणता येईल.
कंपनीच्या अशा टॉक्सिक वातावरणात स्वतःला टिकवून ठेवणं म्हणजे एक मोठी स्पर्धा आहे. ज्यामध्ये प्रत्येकाला यश येईल असे नाही. जर तुम्हीही अशा वातावरणाचा सामना करत असाल तर त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे पाहूयात. (Managing Work Pressure Effectively Strategies for a Healthier You)
2023 मध्ये स्वीडनमध्ये Karolinska Institute मध्ये झालेल्या एका सर्वेनुसार टॉक्सिक वातावरणात काम करणाऱ्या लोकांचा मृत्यू लगेच होतो असे स्पष्ट झाले आहे. एपिडिमॉलॉजी आणि कम्यूनिटी रिपोर्टमध्ये हे रिपोर्ट प्रकाशित झाले आहे. तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये कामाचा धक्का बसू शकतो. स्वतः मध्ये प्रेशर, कम सैलरी आणि जॉब की पूर्ण न होणे मुख्य कारण असू शकते.
ऑफिस मधील राजकारण, स्पर्धा, गॉसिप्स आणि आरोप प्रत्यारोप यामुळे ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या मनावरील ताण वाढतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम त्यांच्या कामावर आणि कंपनीच्या प्रगतीवर सुद्धा होतो. कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घेतली तर कंपनीची ग्रोथ चांगली होईल हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी काही गोष्टी करणे गरजेचे आहे.
दिवसातले आठ ते दहा तास कंपनीसाठी देताना स्वतःसाठी किमान एक तास काढणे गरजेचे आहे. या एका तासात तुम्ही होईल तितका व्यायाम करा. शारीरिक व्यायाम आणि मेडिटेशन करून तुम्ही मनालाही शांत करू शकता.
ऑफिसच्या टेन्शनमध्ये किंवा वेळेवर पोहोचण्याच्या घाईमध्ये तुम्ही नाष्टा किंवा जेवण करत नसाल. ऑफिसमध्ये असतानाही जेवायला वेळ काढत नसाल तर तुम्ही करत असलेल्या काम व्यर्थ आहे. त्यामुळेच तुम्ही फळ, ज्यूस, आरोग्यदायी आहाराचे सेवन केले पाहिजे.
तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवणारी एक गोष्ट असते ती म्हणजे झोप. जी आजकाल प्रत्येकाचीच उडालेली आहे. तुम्हाला ऑफिसमध्ये पूर्ण वेळ चांगले काम करायचा असेल तर तुम्ही पुरेशी झोप घेतलीच पाहिजे. आठवड्यातील केवळ तीन दिवस किंवा दोन दिवस तुम्ही शांत झोपत असाल आणि बाकीचे दिवस असेच मोबाईलवर काढत असाल तर हे चुकीचं आहे. सुट्टी असो किंवा कामाचे दिवस तुम्ही झोप घेतलीच पाहिजे.
दिवसभराच्या आठ तासांच्या कामामध्ये तुम्ही थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेतला पाहिजे. सलग दोन ते तीन तास कम्प्युटरकडे बघत एकाच जागी बसून राहणं तुम्हाला अनेक व्याधींच आमंत्रण देणारं ठरू शकतो. त्यामुळेच तुम्ही थोडा थोडा वेळाने ब्रेक घ्या, चहा घ्या किंवा बाल्कनीतून निसर्गाकडे पाहत रहा.
तुम्ही करत असलेल्या काम व्यवस्थित होत असेल आणि तरीही तुम्हाला त्यावरून बोललं जात असेल तर तुमचा ताण नक्कीच वाढेल. किंवा एकाच वेळी काम करताना अनेक विचार जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा तुमच्या कामात लक्ष नसतं अशा वेळी सुद्धा तणाव वाढू शकतो. त्यामुळे ताण नक्की कशामुळे वाढतोय याचे कारण शोधा.
कोणीतरी म्हटलंय की, सर्व काही विकत घेता येतात पण वेळ घेता येत नाही. तुम्हाला जितके तास दिले आहेत तितक्याच वेळात तुम्ही किती चांगलं काम करून वेळ वाचवू शकता हे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे दिवसाची सुरुवात प्रसन्न मनाने करून संपूर्ण दिवसाची नियोजन करा. कामाचेही योग्य व्यवस्थापन करा. तुम्हाला टार्गेट दिलं असेल तर ते टार्गेट किती वेळात पूर्ण करायचा याचाही योग्य नियोजन करा म्हणजे तुम्हाला जास्त वेळ काम करावे लागणार नाही.
एखादी गोष्ट समजत नसेल तर ती समजून सांगण्यासाठी एखाद्याकडे मदत मागा. जर तुम्हाला ती गोष्ट त्या व्यक्तीने समजावल्यानंतर समजली असेल तर त्यात लाजण्यासारखं काहीच नाही. तुम्ही जितक्या शंका उपस्थित कराल, तितकं तुमचं शंका निरसन होईल आणि तुमचं काम परफेक्ट होईल.
तुम्ही दिवसभरात काम कुटुंब मुलं आणि आवडीनिवडी यांना किती वेळ देता याचा जरा नियोजन करा. कामातून वेळ काढून तुम्ही एखादी ट्रिप कधी केली आहे, एखादे चॉकलेट किंवा एखादी आवडती पाणीपुरी कधी खाल्ली आहे याचा विचार करा. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर ती गोष्ट करून किती दिवस झालेत याचा नक्कीच विचार करा. यामुळे तुम्ही तुमच्या मनाला रिफ्रेश करू शकता. त्यामुळेच तुमच्या छंद जोपासा त्यामुळे तुमचा ताण हलका होऊ शकतो.
जेव्हा एखादी अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा तुम्हाला राग आलेला असतो पण तो व्यक्त करायचा नसतो. तेव्हा तो राग तुमच्या शरीरालाही बाधित करते. त्यामुळे कोणाचा राग येऊ दे किंवा शरीराच्या चांगल्यासाठी तुम्ही मेडिटेशनची सवय लावून घ्या. ही सवय तुमच्या फायद्याची ठरू शकते.
तुम्ही ऑफिसमध्ये करत असलेल्या कामात प्राधान्य कुठल्या कामाला द्यायचा हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुम्ही अती महत्त्वाचं काम पटकन केलं आणि नंतर एखादं केलं तर त्याचा परिणाम तुमच्या वरिष्ठांवरती चांगला पडू शकतो.
काही लोकांना सवय असते की उगीचच अंगावरती भरमसाठ काम घेऊन ठेवायचे आणि पुन्हा ती करताना कंटाळा करायचा. त्यामुळेच तुम्ही प्रत्येक कामाला हो म्हणू नका, पण जे जमेल जे पटकन होईल त्या कामाला नक्कीच हात घाला. यामुळे तुमच्या मनासारखे तुम्हाला काम करता येईल.
तूच आहेस तुझ्या जीवनाच्या शिल्पकार हे तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही जे आहात जसे आहात ते तुम्ही स्वतः घडवलेले आहात. तुम्ही स्वतःशी सकारात्मक बाजू घेऊन बोलत रहा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि काम पूर्णत्वाकडे नेण्यासही मदत होईल.
काही वेळा जेव्हा आपण घरातून काम करत असतो तेव्हा घरातील आणि ऑफिसमधील काम एकत्रित होऊन जातं. तेव्हा आपला गोंधळ होतो. मग विचार करा, जेव्हा दररोजचं तुमचं ऑफिस आणि घरातलं काम किंवा आयुष्य एकत्र केलं तर किती गोंधळ उडेल. कामाच्या वेळी काम करा आणि कुटुंबाला वेळ द्यायच्या वेळी कुटुंबाला वेळ द्या. यामुळे तुमची दोन्ही आयुष्य सुखाची जातील.
जेव्हा ऑफिसमधील वातावरणामुळे तुम्हाला ताण आला असेल. किंवा तुमचं कामाचं प्रेशर वाढलं असेल तेव्हा ते दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत बोलू शकता. किंवा तुम्ही एखादी थेरपी घेऊ शकता किंवा सकारात्मक राहण्यासाठी कुटुंब आणि काम बॅलन्स करण्यासाठी समुपदेशन सुद्धा घेऊ शकता. याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल.
तुम्ही तुमच्या स्वभावात काही बदल करणे गरजेचे आहे. त्यात सतत सकारात्मक राहणे हा एक महत्त्वाचा बदल आहे. तुम्हाला जी गोष्ट होणार नाही असे वाटते, ती गोष्ट मी करून दाखवेन अशा जिद्दीने केली तर ती नक्की पूर्णत्वास जाते. त्यामुळे तुम्ही नेहमी कृतज्ञतेची भावना ठेवा आणि सरकारात्मक रहा.
तुमचे काम सोपे होण्यासाठी तुम्हाला कोणत्या साधनांची गरज आहे हे ओळखा. काही ॲप्स असतील, काही वस्तू असतील लॅपटॉप, मोबाईल अशा गोष्टी नक्कीच सोबत घ्या. त्यामुळे तुमचं काम थोडं हलकं होईल आणि तुम्हाला या वस्तूंसाठी किंवा साधनांसाठी कोणा इतरांवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.
- एखादा काम नियोजन पद्धतीने केले तर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरतं त्यामुळे कुठलाही कमी प्रमाणात न बाळगता तुम्ही काही गोष्टी उघडपणे बोलल्या आणि केल्या पाहिजेत.
- तुमची काम विभागून घ्या
- ऑफिस मधील इतर सहकाऱ्यांचे जबाबदारी वाटून द्या
- सहकारी मार्गदर्शक आणि कंपनी व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन घ्या
- स्वतःला रिचार्ज करण्यासाठी पिकनिक ट्रिप्स अशा सुट्टीचे प्लॅन करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.