Tips For Trekking : ज्या क्रीडा प्रकारांमध्ये नैसर्गिक धोके असतात आणि ते धोके टाळण्यासाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण घ्यावे लागते असे क्रीडा प्रकार म्हणजे साहसी क्रीडा प्रकार. अखिल भारतीय क्रीडा मंडळाने गिर्यारोहणाला साहसी क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिल्यानंतर तरूणाईला या खेळाने वेड लावलेय. गिर्यारोहण करताना काय काळजी घ्यायला हवी त्याबद्दल जाणून घेऊयात...
आईस क्लाईंबिंग (Ice Climbing) आणि रॉक क्लाईंबिंग (Rock Climbing) अशा दोन प्रमुख प्रकारात गिर्यारोहण हा साहसी क्रीडा प्रकार विभागला जातो. या दोन्हींपैकी रॉक क्लाईंबिंग हा प्रकार भारतात अधिक प्रचलित आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या डोंगररांगा तरूणाईला साद घालतात. गिर्यारोहणामुळे वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळत असल्यामुळे दैंनंदिन धकाधकीमधून आवर्जुन वेळ काढत तरूणाई गिर्यारोहणाला जाते. महाराष्ट्राला भव्य अशा कणखर, राकट आणि निसर्ग संपन्न सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं वरदान लाभलेय.
मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर इथेही गिर्यारोहणाची अनेक ठिकाणे आहेत. यात प्रामुख्याने शहरातील विद्यापीठ बुद्ध लेणी, गोगाबाबा टेकडी, दौलताबाद, सारोळा, साई टेकडी, सुलतानगड, शुलीभंजन यासारखी नानाविध सुंदर स्थळे आहेत. या ठिकाणी शहरातील अनेक तरुण,तरुणी गिर्यारोहणासाठी येतात. गिर्यारोहण म्हणजे केवळ फिरायला जाणे किंवा टेकडी चढणे इतकाच अर्थ नसतो. त्यामुळेच ट्रेकिंगला जाताना काही गोष्टीची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक ठरते. (Rock Climbing Tips)
अन्यथा आवड म्हणून केलेले गिर्यारोहण जीवावर बेतण्याचा धोका असतो. ट्रेकला जाताना गिर्यारोहकांनी स्वतःच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य द्यायला हवे. ट्रेकिंगला निघण्यापूर्वी त्यासाठी लागणारे सर्व साहित्य योग्य स्थितीत आहे, याची खातरजमा करावी. कारण ट्रेकिंगला जाताना कधी कोणती परिस्थिती समोर उभी राहू शकेल हे सांगता येत नाही, असा सल्ला ए टू झेड एडव्हेंचर चे असलम मोतीवाला सांगतात. (Trekking Tips in Marathi)
मानसिक तयारीसोबतच फिजिकली फिट राहणेही गरजेचे आहे. त्यासाठी फिरायला जाण्यापूर्वी व्यायाम, रनिंग करा. यासोबतच आणखीही काही व्यायाम केल्यास ट्रेकिंगला जाताना अडचण येणार नाही. (Preparation for Trekking)
उत्साहाच्या भरात गिर्यारोहक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. डोंगरावर किंवा जंगलात जाताना तिथल्या बोर्डवर सुचनांची माहिती दिलेली असते. त्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमांचे पालन करा.
ट्रेकिंगला जात आहात त्या जागेची पूर्ण माहिती तुम्ही घ्यायला हवी. जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही. या जागेवर आधी जाऊन आलेल्या लोकांकडून किंवा गुगलवरुन माहिती मिळवणे कधीही योग्य ठरते.
या साहसी पर्यटनासाठी तुम्हाला रॉक क्लाइंबिंगचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.
गिर्यारोहकाने रॉक क्लाइंबिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले असणे अनिवार्य आहे.
गिर्यारोहणादरम्यान हेल्मेट पूर्णवेळ परिधान करणे आवश्यक आहे.
गिर्यारोहणासाठी लागणारे सर्व साहित्य उदा. रोप्स, अँकर्स, हार्नेस हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त व उच्च दर्जाचे असतील तरच वापरा.
या सर्व साहित्याची वेळोवेळी तपासणी करा. त्याची देखभाल करा.
या गिरीभ्रमंती दरम्यान पुरेसे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ सोबत असणे अतिशय गरजेचे असते.
आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास त्या वेळेत लागणार्या सुविधांची पूर्वतयारी करून ठेवणेही गरजेचे असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.