silica gel 
लाइफस्टाइल

बॅगेत आढळून येणारी 'ही' पुडी फेकून देताय? त्यापूर्वी तिचं महत्त्व तर जाणून घ्या

सकाळवृत्तसेवा

एखादी नवीन बॅग किंवा पाण्याची बाटली खरेदी केली की, त्यात एक लहानशी पुडी कायमसोबत मिळते. मात्र, ही पुडी उघडू नका? किंवा ती लहान मुलांच्या हातात देऊ नका?, असं त्यावर कटाक्षाने लिहिलेलं असते. विशेष म्हणजे या मजकुरामुळेच या पुडीत नेमकं काय आहे याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये निर्माण होते. त्यामुळे ही पुडी फाडू नका, असं लिहिलेलं असतानादेखील काही जण ती उघडतात. ही पुडी उघडल्यानंतर त्यात पांढऱ्या किंवा पारदर्शक लहान लहान दाणे किंवा खडे पाहायला मिळतात. हे दाणे नेमके कशाचे आहेत किंवा मग ते या नव्या वस्तुंच्या आता कशासाठी टाकतात हा नवा प्रश्न निर्माण होतो. तर हे लहान दाणे अत्यंत उपयोगाचे असून त्याला 'सिलिका जेल पॉकेट' असं म्हटलं जातं. आता हे 'जेल पॉकेट' नेमकं कशासाठी टाकतात किंवा त्याचे फायदे काय हे जाणून घेऊयात.

१. जर बॅगमध्ये कुबट वास येत असेल तर त्यामध्ये सिलिका जेट पॉकेट ठेवावं. या पॉकेटमुळे बॅगेतील कुबट वास दूर होतो. त्यामुळे शक्यतो जीम बॅग किंवा शूजच्या बॅगमध्ये हे पॉकेट ठेवावं.

२. बऱ्याच वेळा अल्बम जुना झाला किंवा बंद करुन ठेवला असेल तर त्यावर हवेमुळे बुरशी चढते. अशा वेळी अल्बममध्ये सिलिका पॉकेट ठेवावं. त्यामुळे अल्बमवरील बुरशी दूर होते आणि एकमेकांना चिकटलेली पानेदेखील वेगळी होतात.

३. पुस्तके जुनी झाल्यावर त्यातून विशिष्ट प्रकारचा वास येतो. हा वास घालवण्यासाठी त्यामध्ये सिलिका पॉकेट ठेवावं.

४. सिलिका पॉकेटमध्ये आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे मोबाईल किंवा फोनमध्ये पाणी गेलं असेल तर त्यावर सिलिका पॉकेट ठेवावं.

५. पावसात शूज भिजल्यानंतर त्याला कुबट वास येत असेल तर त्यात सिलिका पॉकेट ठेवावे. यामुळे शूजमधून येणारा खराब वास दूर होतो.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata: राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र; रतन टाटांसाठी केली 'ही' महत्वाची मागणी

Latest Maharashtra News Updates : रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले

PAK vs ENG 1st Test: पाकिस्तानच्या ६ गोलंदाजांची 'Century'! इंग्लंडसमोर लाचारी,ही तर झिम्बाब्वेपेक्षा बेक्कार कामगिरी

Ratan Tata: स्वातंत्र्यलढ्यात रतन टाटांनी इंग्रजांना हैराण केलं होतं; ब्रिटिश गाड्यांच्या इंजिनात साखर टाकायचे अन्...

Ratan Tata: रतन टाटांच्या मदतीने अवघ्या 21व्या वर्षी उभारली 500 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT