साडी कोणत्याही पद्धतीची असेल तर चर्चा तिच्या ब्लाऊजची जास्त होते. सध्या कुठल्या साडीवरती मॅचिंग नव्हे तर डिझायनर ब्लाऊज घातला जातो. डिझायनर ब्लाऊज नवरीच्या लुकला परिपूर्ण बनवतो. त्यामुळेच डिझायनर ब्लाऊजची क्रेझ सध्या महिला वर्गात दिसत आहे.
सध्या आरी वर्कची फॅशन आहे. प्रत्येक महिलेकडे एखादा संपूर्ण डिझायनर ब्लाऊज असतोच. तशी इच्छा प्रत्येकीची असते. तुम्ही काही डिझाईन वापरून तुमच्या पार्टीवेअर ब्लाउजला डिजाइनर बनवू शकता. तुम्ही बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत असाल तर हे ब्लाउजचे डिझाईन पाहून घ्या. (Fancy Blouse Designs)
गौरीमध्ये महिला छान तयार होऊन हळदी कुंकवाला जातात. यंदा तुम्हीही पार्टीवेअर ब्लाउज घालाल तर चारचौघीत तुमची चर्चा जास्त होईल. त्यामुळे तुम्ही ब्लाऊजचे हे काही डिझाईन्स तुमच्या उपयोगी येतील
मोत्यांचे मणी
ट्रेंडी ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये मोत्यांचा वापर केलेला दिसतो. पांढऱ्या शुभ्र रंगाचे मोती तुमच्या ब्लाऊजला अधिक वेगळेपण देतात. तुम्ही साधी सिंपल ब्लाऊज शिवून पाठीवरच्या गळ्याला मोत्यांच्या माळा लावू शकता.
वर्क केलेला ब्रोच
ब्लाउजच्या मागच्या बाजूलाही जरकन वर्क करता येते. यासाठी तुम्ही ब्लाउजच्या मागील गळ्याला बाजूला मोठा जरकन ब्रोच लावू शकता. अशा प्रकारचे ब्रोचेस तुम्हाला बाजारात मिळतील. हे दिसताना हेवी दिसते. यामध्ये तुम्हाला फ्रिंज, झुंबर, पेंडेंट अशा सर्व प्रकारच्या डिझाईन्स मिळतील.
सोनेरी मण्यांची लेस
सोनेरी मण्यांची झालरही तुमच्या ब्लाउजच्या मागच्या बाजूस खूप सुंदर लुक देईल. नेट, रेशीम, साटन किंवा मखमली फॅब्रिकपासून बनवलेल्या ब्लाउजच्या मागील बाजूस आपण सोनेरी मोत्याची झालर उपलब्ध आहेत. या प्रकारच्या ब्लाउजमध्ये तुम्ही गोल नेकलाइन, व्ही नेकलाइन किंवा डीप यू नेकलाइन बनवू शकता.
झुमका
जर तुमच्याकडे मोठे झुमके असतील आणि तुम्ही ते जास्त परिधान करत नसाल तर तुम्ही त्यांचा वापर ब्लाउजच्या मागील बाजूस सजवण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्ही तुमचे झुमके ब्लाउजच्या स्ट्रिंगमध्ये बांधू शकता. (Trendy Blouse design )
मोत्यांच्या नेकलेस
सध्या पूर्ण बॅकलेस ब्लाऊज घातले जातात. आपल्याकडे असे फारसे कोणी बॅकलेस ब्लाऊज घालत नाही. कारण सणसमारंभाच्या वेळी तरी पारंपारिक दागिन्यांवर, कपड्यांवर भर दिला जातो. जर तुम्हालाही तुमच्या ब्लाउजला वेगळे दाखवायचे असेल तर तुम्ही तुमच्या पाठीवरील डिझाईन वरती एक नेकलेस वापरू शकता. त्यामुळे तुमचा ब्लाऊज फारसा बॅकलेस वाटणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.