Vijaya Dashami 2023 esakal
लाइफस्टाइल

Vijaya Dashami 2023 : दसऱ्याला हटके लूक हवाय? मग 'या' साडी लूक्सची घ्या मदत

दसऱ्याचा सण अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Dussehra 2023 : नवरात्रौत्सवाची धामधूम सर्वत्र दिसत आहे. आज नवरात्रीचा आठवा दिवस असून सर्वत्र अष्टमीचा उत्साह पहायला मिळत आहे. नवरात्रौस्तवाची सुरूवात १५ ऑक्टोबरला झाली होती तर नवरात्रौत्सवाची समाप्ती २४ ऑक्टोबरला होणार आहे.

मंगळवारी (२४ ऑक्टोबरला) दसऱ्याचा सण आहे. दसऱ्याला हिंदू संस्कृतीमध्ये खास महत्व आहे. विशेष म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण म्हणजे दसरा सण होयं. शौर्य आणि विजयाचे प्रतिक म्हणून दसरा साजरा केला जातो.

नवरात्रीला नऊ रंगांचे विविध प्रकारचे लूक्स केल्यानंतर आता विजयादशमीला कोणता लूक करावा? असा प्रश्न महिलांना नक्कीच पडतो. मात्र, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुमच्यासाठी काही स्टायलिंग टिप्स घेऊन आलो आहोत.

विजयादशमी निमित्त खास लूक करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला सोप्या स्टायलिंग टिप्स सांगणार आहोत. या स्टायलिंग टिप्सच्या मदतीने तुम्ही दसऱ्याला तुमचा लूक करू शकता.

बनारसी साडी

बनारसी साडी तर कोणत्याही फेस्टिव्हलसाठी बेस्ट आहे. बनारसी साडी महिलांची ऑलटाईम फेव्हरेट साडी आहे. ही साडी अनेक रंगांमध्ये मिळते. त्यामुळे, या प्रकारची साडी परिधान केल्यावर ती खुलून दिसते, यात काही शंका नाही.

या दसऱ्याला तुम्ही सुद्धा छान प्रकारे बनारसी साडी स्टाईल करू शकता. त्यावर गोल्डन ज्वेलरी मॅच करायला विसरू नका.

जरतारी पैठणी

पैठणी साडी कोणत्याही सणासाठी आणि कोणत्याही फंक्शनसाठी बेस्ट आहे. जरतारी पैठणीचा स्वॅग मिरवायला अनेक महिलांना आवडते. तुम्ही सुद्धा जरतारी पैठणीचा स्वॅग दसऱ्याला मिरवू शकता.

पैठणीवर सूट होणारी हेअरस्टाईल आणि क्लासी मेकअप केला की तुमचा लूक हीट आहे. हे विसरू नका. पैठणी साडीवर तुम्ही मोत्याची ज्वेलरी किंवा गोल्डन ज्वेलरी कॅरी करून तुमचा लूक पूर्ण करू शकता.

खण साडी

मागील काही वर्षांपासून खण साडी भलतीच महिलांमध्ये लोकप्रिय झाली आहे. दसऱ्याला तुम्ही खणसाडीचा ऑप्शन नक्कीच निवडू शकता. खण साडीमध्ये अनेक प्रकारच्या डिझाईन्स उपलब्ध झाल्या आहेत.

कॉटन आणि रेशमी या दोन्ही प्रकारांमध्ये खण साड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. खण साडीवर तुम्ही ऑक्साईड ज्वेलरी कॅरी करून तुमचा दसरा लूक पूर्ण करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT