Home Remedies For Elbow Sakal
लाइफस्टाइल

Home Remedies: हातांच्या कोपऱ्यांचा काळेपणा झटक्यात करा कमी, वापरा 'हे' घरगुती उपाय

पुजा बोनकिले

सर्वच लोकांना आपण सुंदर दिसावे असे वाटते. पण अनेक लोकांच्या हाताचे कोपरे काळे असतात. हे कमी करण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट असतात. पण त्याचा काही रिझल्ट दिसत नाही. जर तुम्हीही कोपरांच्या काळेपणाने त्रस्त असाल तर घरगुती उपायांनी हाताच्या कोपरांची त्वचा मुलायम, चमकदार बनवू शकता आणि काळेपणा कमी करू शकता.

पुढील घरगुती उपायांचा करू शकता वापर

  • लिंबाचा रस आणि मध

हाताच्या कोपऱ्याचा काळपटपणा कमी करण्यासाठी सर्वातआधी एका भांड्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट कोपरावर 20 मिनिटे लावा, नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

  • बटाटा

बटाट्याचा वापर करून हाताच्या कोपऱ्याचा काळपटपणा कमी करू शकता. यासाठी एक बटाटा उकळून बारीक करावा आणि कोपऱ्यावर २० मिनिटे लाऊन ठेवावे. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.

  • दही आणि हळद

कोपऱ्यांचा काळपटपणा कमी करण्यासाठी दही आणि हळद वापरू शकता. यासाठी एक चमचा दहीमध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करावी. नंतर ही पेस्ट कोपऱ्यावर लावावी आणि २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.

  • खोबरेल तेल

रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल गरम करून कोपरावर लावावे. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे. असे केल्याने कोपऱ्याचा काळेपणा कमी होतो. .

  • कोरफड जेल

कोरफड जेल देखील कोपऱ्यांचा काळेपणा दूर करण्यास मदत करते. कोरफड जेल २० मिनिटे कोपऱ्यावर लावावे आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.

  • पुढील गोष्टी लक्षात ठेवा

या उपायांच्या मदतीने तुम्ही सहजपणे कोपऱ्याचा काळपटपणा कमी करू शकता. हे उपाय करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवमे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते. यामुळे त्वचेचा प्रकार पाहून हे उपाय करावे. हे उपाय केल्यावर तुम्हाला काही समस्या येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT