face sakal
लाइफस्टाइल

Homemade Facial Scrub: घरबसल्या पार्लरसारखा ग्लो हवा आहे? मग या होममेड स्क्रबचा करा वापर

धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेवर बऱ्याच वेळेस घाण किंवा मळ जमा होतो.

Aishwarya Musale

महिला त्यांच्या चेहऱ्याची खूप काळजी घेतात. सतत काही ना काही ट्राय करत असतात. पार्लरला जातात, बाहेरचे प्रोडक्ट वापरतात. पण त्याचा जास्त काही फायदा होत नाही. जर त्वचेवर धूळ किंवा घाण असेल आणि तुम्ही मेक-अप केलात तर पिंपल्स सारख्या समस्या उद्भवू शकतात.

म्हणूनच त्वचेची छिद्रे स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. त्वचेची छिद्रे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरगुती स्क्रब वापरू शकता. त्वचेसाठी स्क्रब बनवण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरात असलेल्या नैसर्गिक गोष्टींचाही वापर करू शकता. हे स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल ते आम्ही तुम्हाला सांंगताे. (Latest Marathi News)

साखर आणि कच्चे दूध

२ चमचे साखरेत थोडे दूध मिसळा. आता या दोन गोष्टींचे मिश्रण मानेवर आणि चेहऱ्यावर लावा. साखर आणि दुधाच्या स्क्रबने त्वचेला 3 मिनिटे मसाज करा. आठवड्यातून दोनदा हा स्क्रब वापरल्याने तुमची त्वचा चमकदार, निरोगी आणि मुलायम होईल.

ओट्स आणि हनी स्क्रब

एका भांड्यात एक चमचा ओट्स पावडर घ्या. आता ओट्समध्ये थोडे मध घाला. ओट्स आणि मधाच्या पेस्टने त्वचेला घासून त्वचा स्वच्छ करा. हे स्क्रब केवळ डेड स्किन सेल्स काढून टाकणार नाही तर ते तुमची त्वचा घट्ट आणि चमकदार देखील ठेवेल.

कॉफी आणि एलोवेरा

जर तुम्हाला घरी स्क्रब बनवायचा असेल तर तुम्ही कॉफी आणि एलोवेराचाही वापर करू शकता. हा स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा कॉफी पावडर लागेल. त्यात एलोवेरा जेल मिक्स करा. कॉफी आणि कोरफड मिक्स करून स्क्रब तयार करता येतो. हा स्क्रब तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणतो.

ओट्स आणि दही

ओट्स आणि दही मिसळून स्क्रब तयार करता येतो. यासाठी एका भांड्यात २ चमचे ओट्स घ्या. या पेस्टमध्ये एक चमचा खोबरेल तेलही मिसळता येते. आता या दोन गोष्टी मिसळा आणि काही वेळ त्वचेला स्क्रब करा. साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT