Winter Two-Wheeler Care esakal
लाइफस्टाइल

Winter Two-Wheeler Care: कडाक्याच्या थंडीत रोज बाइकचा प्रवास होतोय? अशी घ्या बाईकची काळजी

थंडीत केवळ त्वचेचीच नाही तर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते

सकाळ डिजिटल टीम

Lifestyle: शहरी भागात अद्याप थंडीची चाहुल लागली नाही. पण, गावात मात्र दुपारच्यावेळीही लोक शॉल, स्वेटरमध्ये दिसत आहेत. पूर्वी दसरा झाला की थंडी पडायची. पण आता दिवाळी संपली तरी शहरात थंडी जाणवत नाही. थंडीत त्वचा फुटणे, कोरडी होणे, ओठ सुकणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. थंडीत केवळ त्वचेचीच नाही तर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

थंडीत जेवण,नाश्ता गरम खाण्याचा आणि गरम कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. कडाक्याच्या थंडीतही तुम्हाला जॉबवर जाताना रोज बाईकने प्रवास करावा लागत असेल तर तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात दाट धुक्यात बाईकने प्रवास करणे हा रोमांचक अनुभव असला तरी ते करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.

हिवाळ्यात बाइकप्रेमी असलेल्या लोकांसाठी कसोटीचा काळ असतो. ऑफिसला जायच्या घाईत बाइक कधीही वेळेत सुरू होत नाही. रात्रभर कडाक्याच्या थंडीत ती बिचारी बाइक दारातच उभी असते. त्यामुळे गारठल्याने ती सकाळी सुरू व्हायला दमवते. त्यामुळे बाइक हाताळताना काय काळजी घ्यावी हे पाहुयात.

हिवाळ्यात बाइक राईड करताना थर्मल कपडे वापरावेत. हाताला, पोटाला थंडी जाणवू नये यासाठी हे कपडे फायद्याचे ठरेल.

बाइक चालवणे इतरवेळी सोपे असले तरी हिवाळ्यात ते सर्वात कठीण काम असते. थंडी वाजत असल्यामुळे बाइकचा वेग कमी ठेवावा.

रोज बाइक वापराण्यात काही चुक नाही. पण, ऑफिस आणि घराचे अंतर जास्त असेल तर अशावेळी थंडीच्या दिवसात बाइक वापरणे टाळावे.

हिवाळ्या दाट धुके पडते. त्यामुळे बाइकचे इंडिकेटर, हेडलाईट आणि मागील लाईट तपासा. ते दुरूस्त करून घ्या. धुके असल्याने सकाळी प्रवास करताना हेडलाईट, बॅकलाईटचा वापर करा.

हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीचा परिणाम वाहनाच्या बॅटरीवरही होतो. त्यामुळे इंजिन जॅम होते. यासाठी बॅटरी साफ करण्यासोबतच बॅटरीचे पाणीही तपासा. त्यामुळे गाडी सुरू व्हायला दमवणार नाही.

हिवाळा सुरू झालाय पण कडाक्याची थंडी पडायच्या आधी गाडीचे सर्विसिंग करून घ्या. त्यामुळे गाडी बंद पडणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT