Diabetes Type 1: Sakal
लाइफस्टाइल

Diabetes Type 1: 'टाईप 1 मधुमेह' येणार नियंत्रणात! स्टेम सेल्स केले ट्रान्सप्लांट, आरोग्य क्षेत्रातील मोठं संशोधन!

पुजा बोनकिले

Diabetes Type 1: सध्याच्या अयोग्य खाणपान आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तसेच हा आजार सामान्य बनला आहे. मधुमेहाचे टाइप 1 आणि टाइप 2 असे दोन प्रकार असतात.

टाइप 1 मधुमेहामध्ये रूग्णाच्या स्वादुपिंडात इन्सुलिन तयार होत नाही. यामुळे आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णाला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावे लागते. तसेच टाइप 2 मधुमेह असलेल्या रूग्णाला जीवनशैली आणि आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. आता टाइप 1 मधुमेहावरील उपचाराबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. स्टेम सेल्स प्रत्यारोपण करून टाइप 1 मधुमेहापासून सुटका मिळवता येणार असा दावा चिनी शास्त्रज्ञांनी केला आहे.

काय आहे स्टेम सेल्स थेरपि?

चिनी वृत्तपत्रानुसार, 25 वर्षीय महिला अनेक दिवसांपासून टाइप १ मधुमेहाने त्रस्त होती. चिनी शास्त्रत्रांनी तिचे स्टेम सेल्स प्रत्यारोपन केले. या शस्त्रक्रियेनंतर केवळ अडीच महिन्यांनी या महिलेची साखरेची पातळी नियंत्रणात आली. हाँगकाँगमधील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या शस्त्रक्रियेला फक्त अर्धा तास लागला.

स्टेम सेल्स प्रत्यारोपण करून मधुमेह नियंत्रित करणाऱ्या टीमने गेल्या आठवड्यात 'सेल' जर्नलमध्ये त्याचे निष्कर्ष प्रकाशित केले. अहवालानुसार, 'टियांजिन फर्स्ट सेंट्रल हॉस्पिटल अँड पेकिंग युनिव्हर्सिटी'चे संशोधकही या अभ्यासात सहभागी झाले होते.

आधी उपचाराची पद्धत कसी होती?

टाइप 1 मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी मृत दात्याच्या स्वादुपिंडातून आयलेट पेशी काढून टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या यकृतामध्ये प्रत्यारोपण केले जात होते. स्वादुपिंडातील 'आयलेट' पेशी 'इन्सुलिन' आणि 'ग्लुकागन' सारखे हार्मोन्स तयार करतात, जे रक्तातील 'ग्लुकोज'ची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पण आता दान करणाऱ्या व्यक्तींची कमतरता असल्याने असे करणे कठीण झाले आहे.

स्टेम सेल्स उपचार कसा करतात?

संशोधकांच्या मते, आता स्टेम सेल्स थेरपीने मधुमेहापासून सुटका मिळवता येते. या उपचार प्रक्रियेमध्ये रासायनिक प्रेरित प्लुरिपोटेंट स्टेम-सेल-ड्राइब्ड आयलेट्स किंवा सीआयपीएससी आयलेट्स वापरतात. या प्रक्रियेत रुग्णाकडून पेशी घेतल्या जातात आणि त्यात काही रासायनिक बदल केले जातात. त्यानंतर ते पुन्हा रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule: कसोटी मालिका संपली आता पुढची मॅच कधी... जाणून घ्या टीम इंडियाचं पुढील वेळापत्रक

Anganwadi sevika: अंगणवाडी सेविकांना पाच हजारांची मानधनवाढ?; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

Mumbai Accident: अंधेरित ड्रेनेजमध्ये पडून महिलेच्या मृत्यू प्रकरणात मेट्रो अन् कॉन्ट्रॅक्टरच जबाबदार; समितीच्या अहवालात नमूद

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात कॉलेजच्या वॉचमनकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; नागरिकांकडून चोप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Manwat Murders : "ते हत्याकांड आमच्या गावाजवळच घडले"; मकरंद अनासपुरे यांनी सांगितली ती आठवण , "उत्तमरावची भूमिका..."

SCROLL FOR NEXT