Types Of Relationships : प्रेम ही एक भावना असून प्रत्येकाच्या आयुष्यात तिचे स्थान आणि महत्व वक्तीनुसार बदलत जाते. आपण आपल्या जीवन वेगवेगळ्या प्रेमाचा अनुभव घेत असतो. मित्र मैत्रिणींचं प्रेम, भावंडाचं प्रेम, पालकांचं प्रेम आणि प्रियकराचं प्रेम. प्रेमात काही नियम नसतातच.
शिवाय प्रेम ही भावना ठरवून उत्पन्न होत नाही. मात्र अनेकदा आपल्याला एखाद्या व्यक्तीबाबत काय वाटतं हे कळणं कठीण असतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत नेमके कोणत्या प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये आहात हे तुम्हाला या काही संकेतांतून ओळखता येईल. वाचा सविस्तर.
सेल्फ लव्ह
प्रेम हे नेहमी दोन व्यक्तींमध्येच असते असे नाही. तुमचं स्वत:वरही इतरांपेक्षा जास्त प्रेम असू शकतं. स्वत:ला आहे तसे स्वीकारणे आणि स्वत:चं कौतुक करणं याला आपण स्वप्रेम किंवा सेल्फ लव्ह म्हणू शकू. सेल्फ लव्ह ही एक अशी प्रक्रिया आहे जी व्यक्तीला स्वत:वर प्रेम करायला शिकवते.
सेल्फलेस लव्ह
कुठलीही अपेक्षा न करता निस्वार्थपणे प्रेम करणे म्हणजे सेल्फलेस लव्ह. निस्वार्थ प्रेम करणे हीच पवित्र प्रेमाची ओळख आहे. असं प्रेम करणारी माणसं स्वभावाने दयाळू आणि प्रेमळ असतात. निस्वार्थ प्रेमाचं उत्तम उदाहरण म्हणजे आई जी तिच्या मुलांकडून कुठलीही अपेक्षा न बाळगता प्रेम करते. (Relationship Tips)
ऑब्सेसिव्ह लव्ह
ऑब्सेसिव्ह प्रेमात असणारे सगळ्या सीमा पार करतात. अशा रिलेशनशिपमध्ये तुमचं पार्टनरवर एवढं प्रेम असतं की तुम्ही प्रेमात त्याला त्राससुद्धा देऊ शकता. असे लोक त्यांच्या पार्टनरवर कंट्रोल ठेवतात. ते दूर जाण्यापासून घाबरतात. आणि ते दूर गेल्यास त्यांना मिळवण्यासाठी सगळ्या सीमा पार करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.