Unidentified Illness : आज समाजामध्ये डाँक्टरकडे खुप आदराने आणि सन्मानाने बघितले जाते कारण जेव्हा आपण एखाद्या आजारापुढे रोगापुढे हताश आणि निराश होऊन अक्षरश हात टेकून देत असतो. तेव्हा ह्या अशा निराशेच्या परिस्थितीत आपल्याला एकच व्यक्ती आहे जो आशेचा किरण दाखवत असतो आणि तो व्यक्ती म्हणजे डाँक्टर.
आज आपण डाॅक्टरांना देवाचा दर्जा देतो कारण तीच एक अशी व्यक्ती असते जी आपल्याला गंभीरातील गंभीर आजारातुन देखील बर करत असते. मृत्युच्या दारातुन आपल्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांनी सहीसलामत घेऊन येत असते. (Unidentified Illness : Unidentified Illness: Which Doctor to Consult When the Disease is Unknown)
देशभरात नुकताच राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा झाला. डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो, ते केवळ जीवनच जन्माला घालत नाहीत तर जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करणाऱ्या लोकांवर उपचारही करतात. म्हणूनच डॉक्टरांना जीवनदाते म्हणतात. (Doctors)
डॉक्टरांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे 1991 मध्ये सुरू करण्यात आले होते. प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांना समर्पित आहे.
आजच्या काळात शरीराच्या जवळपास प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळे तज्ज्ञ आहेत. पण हा आजार काय आहे हे माहित नसेल तर कोणत्या डॉक्टरांना भेटावे? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असेल तर आम्ही तुम्हाला त्याचे उत्तर सांगणार आहोत.
आजारी असताना प्रथम कोणत्या डॉक्टरांना भेटावे?
तुम्हाला शरीरात कोणत्याही प्रकारची समस्या जाणवत असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधावा. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन माहिती काउंटरवर तुमची समस्या सांगू शकता आणि योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
पण जर तो पर्याय नसेल तर तुम्ही डॉक्टर ऑफ मेडिसिन बनू शकता, सामान्यतः MD म्हणून ओळखले जाते. त्यांना दाखवू शकता. एमडी डॉक्टर कोणत्याही प्रकारचा आजार पाहून योग्य उपचार सांगू शकतात.
डॉक्टर रोगाचे निदान कसं करतात?
रोग शोधण्यासाठी, डॉक्टर तुमच्या चाचण्या करतील, त्यानंतर ते तुम्हाला समस्येनुसार तज्ञाचे नाव देखील सांगतील. जर तुमच्या जवळ एमडी डॉक्टर नसेल तर तुम्ही जनरल फिजिशियनचा संदर्भ घेऊ शकता.
जनरल फिजिशियन सुद्धा तुमची तपासणी करून तुम्हाला उपचार सांगतील आणि जर हा आजार गंभीर असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या रोगाच्या तज्ञांना भेटू शकता.
कोणत्या आजारावर असतील तर कोणाला भेटाल
हृदयविकार – Cardiologist हा हदयाचा डाँक्टर असतो ज्याला आपण इंग्रजीत असे देखील म्हणतो. हे हदयाशी संबंधित आजारांवर उपचार करीत असतात. भविष्यात आपल्याला हदयाशी संबंधित कुठलाही आजार जडु नये यासाठी आपण Cardiologist कडुन नियमित तपासणी करायला हवी.
दातांचे दुखणे - Dentist म्हणजेच दातांचा डाँक्टर.जर आपले दात किडलेले असेल दाढ दुखत असेल,दाढ काढायची असेल,दात दुखत असतील तसेच दाताशी संबंधित इतर कुठलीही समस्या असेल तर अशा वेळी आपण Dentist कडे उपचारासाठी जात असतो.
त्वचाविकार - Dermatologist म्हणजेच त्वचेचा डाँक्टर जे त्वचेशीसंबंधित कुठल्याही आजारावर उपचार करत असतात.
स्त्रीरोग तज्ज्ञ - Gynecologist म्हणजेच स्त्रीरोगतज्ञ.जे महिलांना गर्भधारणेशी संबंधित असलेल्या कुठल्याही समस्यांवर आजारांवर उपचार करीत असतात.
लहान मुलांचे आजार - Pediatrician म्हणजे लहान मुलांवर,नवजात शिशुंवर उपचार करणारे डाँक्टर.हे नवजात शिशुंना असलेले कुठलेही आजार,विकार तसेच श्वसनाशी संबंधित त्रास इत्यादींवर उपचार करीत असतात.
बालकांचे मेंदू विकार - Neonatologists यांना आपण नवजात जन्मलेल्या शिशुवर,बाळावर उपचार करणारे डाँक्टर म्हणुन ओळखतो. Podiatrist चा Advanced Course पुर्ण करून आपणास Neonatologists बनता येत असते.
मेंदू विकार - Neurologist हे मेंदुशी संबंधित आजारांवर उपचार करीत असतात. हे मज्जासंस्थेशी,चेतासंस्थेशी निगडीत आजारावर विकारांवर उपचार करीत असतात.हे डाँक्टर अल्झायमर,मिरगी येणे इत्यादी समस्यांवर उपचार करण्याचे काम करतात.
कॅन्सरतज्ज्ञ - Oncologist कँन्सर तज्ञ असतात जे कँन्सरशी संबंधित कुठल्याही आजारांवर विकारांवर उपचार करीत असतात.आणि कँन्सरग्रस्त रूग्णांवर उपचार करून त्यांना बरे करत असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.