the use of fenugreek seeds for hair and face pack and glow in kolhapur 
लाइफस्टाइल

चेहऱ्याला आणि त्वचेला सुंदर ठेवण्यासाठी मेथीबियांचा करा वापर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : साधारणतः प्रत्येक भारतीय किचनमध्ये तुम्हाला मेथीबी पाहायला मिळते. ग्रेवीचा स्वाद वाढवण्यासाठी महिला याचा वापर करतात. हे आपल्या आरोग्यासाठीही चांगले असते. कारण यामध्ये विटामिन, फायबर, मिनरल्स यांचे प्रमाण अधिक असते. काही महिला आपले केस सुंदर ठेण्यासाठी याचा उपयोग करतात. परंतु खूप सार्‍या महिलांना ही एक गोष्ट माहित नसते की, याचा वापर तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी कसा होऊ शकतो. अगदी बरोबर, केस आणि त्वचा यांच्या समस्यांना दूर करण्यासाठी मेथीबियांचा उपयोग केला जातो. काही महिलांना याचा योग्य उपयोग कसा करावा याबद्दल माहिती नाही. त्यामुळे महिलांना आम्ही मेथीबियांचा वापर त्यांच्या त्वचेसाठी कसा करावा आणि त्याचे फायदे सांगणार आहोत.

केसांसाठी मेथीबियांचा वापर 

जर तुम्हाला गळणाऱ्या केसांच्या समस्यांवर उपाय हवा असेल तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनेमध्ये याचा समावेश करू शकता. मेथीबीमध्ये उपलब्ध असलेले निकोटिनिक ऍसिड आणि प्रोटीन तुमच्या केसांना मजबूत करतात. आणि खराब केसांना पुनर्जीवित करण्यास मदत करतात. यासोबतच यात लेसिथिन असते जे केसांची चमक वाढवण्यास मदत करते. मेथी बियांचा वापर करून केसांच्या समस्यांवर सोप्या पद्धतीने इलाज करता येतो. याचा वापर तुम्ही केसांचे गळणे आणि कोंडा या समस्यांपासून दूर राहू शकता. यासोबतच त्याच्या नियमित वापराने केस काळेभोर होण्यास मदत होते. केसांना होणारा पांढरेपणाही यामुळे रोखता येतो. 
 
उपाय नंबर 1

साहित्य - 

मेथीबी - 1 मोठा चमचा 
दही - 3 मोठा चमचे 

उपाय 

  • याला तयार करण्यासाठी मेथीच्या बियांना पिसून घ्या आणि दहीसोबत एकत्र करा.
  • या पेस्ट स्कैल्पवर लावा आणि अर्धा तासासाठी तसेच सोडून द्या.
  • यानंतर शाम्पू घालून केस धुऊन घ्या. 

उपाय नंबर 2

साहित्य - 

मेथीबी - 1 मोठा चमचा
खोबरेल तेल - 50 ग्रॅम

करण्याची पद्धत - 

  • याला बनवण्यासाठी खोबरेल तेलात मेथीबी उकळुन घ्या आणि पुन्हा थंड होण्यासाठी ठेवा.
  • जेव्हा थंड होईल तेव्हा हलक्या हातांनी केसांना मालिश करून ते लावा. 
  • याच्या नियमित वापरामुळे केसांची गळती कमी होते. तसेत स्कैल्पची समस्या कमी करण्यासाठीही याची मदत होते. 

त्वचेसाठी मेथीबियांचा उपयोग - 

जर तुम्ही चेहऱ्यावरील दाग धब्बे आणि सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही नैसर्गिक गोष्टींच्या शोधात असाल, तर मेथीबिया हा सर्वोत्तम उपाय आहे. यामध्ये अँटी इंफ्लेमेंटरी आणि अॅंन्टीबॅक्टरियल असे दोन गुण आहेत. या दोन्हींचा उपयोग दाग धब्बे आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी होतो. मेथीमध्ये उपलब्ध असलेले अँटिऑक्सिडंट आणि वय वाढवण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करते. यात उपलब्ध असलेले डायोसजेनिन काळे डाग आणि ड्रायनेससोबत लढण्यास मदत करते, आता याचा उपयोग कसा करावा हे पाहुयात...

उपाय नंबर 1

साहित्य 

मेथीबी - 1/2 चमचा 
मध - 1 चमचा

तयार करण्याची पद्धत - 

  • याचा फेस पॅक बनवण्यासाठी सुरुवातीला मेथीबी काही वेळासाठी भिजवून घ्या. भिजलेल्या मेथीबी पिसून घ्या. आणि त्यामध्ये मध घाला. ते मिश्रण शिजवून घ्या.  
  • या मिश्रणाला रात्रभर त्वचेवर लावून तसेच राहूद्या. 
  • दुसर्‍या दिवशी सकाळी ते पाण्याने धुऊन टाका.

उपाय नंबर 2 

साहित्य - 

बेसन -1/2 चमचे
मेथीबी - 1/2 चमचे  
दही - 1 चमचे

  • सुरुवातीला मेथीबी पिसून घ्या.
  • नंतर मेथी, बेसन आणि दही वापरुन एक पेस्ट तयार करून घ्या. 
  • वीस मिनिटे हे मिश्रण लावून ठेवा. नंतर पाण्याने धुऊन टाका. 
  • चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी मदत करेल. 

टीप ः (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: मोदींच्या शिक्षणासंबंधी टिपण्णी; केजरीवालांविरोधातील समन्स रद्द करण्यास कोर्टाचा नकार

IND vs UAE : Rasikh Salam ने ५ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या; राहुल चोप्रा भारताला नडला तरीही UAE चा संघ १६.५ षटकांत तंबूत परतला

Adul News : पावसाच्या अस्मानी संकटानंतर आता शेतमजुर टंचाईचे संकट

Supreme Court: ''चांगल्या शाळा उघडा'' सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, बोर्ड परीक्षांवरुन खरडपट्टी

Amey Wagh : गौतमी पाटीलमुळे चित्रपटाला फायदा ? अमेय वाघने सांगितला गौतमीचा खास गुण

SCROLL FOR NEXT