Hair Color: Sakal
लाइफस्टाइल

Side Effects Of Hair Color: हेअर कलरमुळे होणारी हानी टाळण्यासाठी वापरा 'या' घरगुती गोष्टी

Side Effects Of Hair Color: घरगुती नैसर्गिक गोष्टी वापरून आपण केसांच्या रंगाबरोबर त्यांचा पोत सांभाळून होणारी हानी टाळू शकतो.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. अनुपम टाकळकर, त्वचारोगतज्ज्ञ

Hair Color side Effects

मानवी सौंदर्यात भर घालणारे म्हणजे डोक्यावरचे केस. एखादा पांढरा केस दिसू लागला, की मग ती स्त्री असो की पुरुष, खडबडून जागे होतात. मग केस डाय करावे वाटणे स्वाभाविकच. बाजारातल्या हेअर कलरच्या जाहिराती बघून त्यातल्या त्यात चांगल्या दर्जाचा आणि खिशालाही परवडणारा अशी सांगड घालून हेअर कलर लावले जातात.

आजकाल इतरांपेक्षा वेगळे आणि स्टायलिस्ट दिसण्यासाठी केसांवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. पण, या हेअर कलरचे साइड इफेक्ट्स आहेत. घरगुती नैसर्गिक गोष्टी वापरून आपण केसांच्या रंगाबरोबर त्यांचा पोत सांभाळून होणारी हानी टाळू शकतो.

कोणतेही हेअर कलर घ्या, त्यामध्ये अमोनिया असतोच, ज्यामुळे केसांचा पोत बिघडतो. केस गळू लागतात, निस्तेज होतातच; तसेच या हेअर कलरचा शरीरावरही विपरीत परिणाम होतात. प्रत्येकाच्या शरीराच्या क्षमतेनुसार हेअर कलरचा त्वचा, डोळे, मेंदू, घसा आणि चेहऱ्याच्या रंगावर अॅलर्जी झाल्याचे दिसून येते. चेहऱ्यावर सूज येते, डोळे चुरचुरू लागतात.

  • काळे केस टिकवायचे असतील तर ‘हे’ करा

आहार महत्त्वाचा

पोषक आहार हे अकाली केस पांढरे होणाऱ्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अण्टिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असलेल्या आहारामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होऊन पांढरे केस जलद होण्याचे प्रमाण रोखले जाऊ शकते.

आहारामध्ये दूध, चीज, अंडी, मासे, मांसाहार आदी पोषक घटकांचा समावेश करावा. जीवनातील स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करावा. सात ते आठ तास शांत झोप घेणे हितावह. रोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करावा. घरच्या घरीच विविध उपचार करणे टाळून त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. धावपळीच्या जीवनात आपण ताण खूप घेतो.

पोट भरण्यासाठी काही तरी खाऊन भूक भागविण्याची पद्धत रूढ झाली. मग ही भूक फास्टफूडने भरून काढतो. त्यामुळे शरीरातील न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होते. आपल्याला जर कोणताही आर्थिक भुर्दंड नको, हेअर कलर नको, त्याचे परिणाम नको असतील आणि नैसर्गिक पद्धतीने केस काळे ठेवायचे असतील, तर भारतीय आहाराचा स्वीकार करा. भारतीय आहार ही सर्वोत्तम उपचारपद्धती आहे. शरीराला आवश्यक असलेले न्यूट्रिशन मिळवून आरोग्य ठणठणीत ठेवल्यास पांढऱ्या केसांची समस्या कमी होण्यास मदत होईल.

  • हे करून बघावे

लाल कांद्यातील सल्फर नावाचा घटक हा केसांची निगा राखण्यास मदत करतो. दोन चमचे लाल कांद्याचा रस, दोन चमचे तेल एकत्रित करून केसांच्या मुळाशी मसाज करा. कोमट पाण्याने केस धुवा. आवळा चूर्ण मोठ्या बाऊल पाण्यात टाकावे. तुळशीची पाने टाकावीत. हे पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर केस काळे होण्याबरोबर केस मजबूत करू शकतो. एक चमचा आवळा पावडर, पेस्ट तयार होईपर्यंत लिंबू रस मिश्रण करून रात्री झोपताना लावावे. सकाळी उठल्यावर डोके धुवावे. २१ दिवस हा प्रयोग करावा याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

  • डायमुळे केसांच्या मुळांवर आघात 'हे' टाळा

हेअर ड्रायर, स्ट्रेटनिंग आयर्न, कर्लिंग आयर्न यांचा वापर मर्यादित प्रमाणात करा.

गरम पाण्यानं केस वारंवार धुऊ नका.

सोनेरी, निळा, बरगंडी, लाल असे वेगवेगळे हेअर कलर वापरणे टाळा.

केस धुण्यासाठी वापरता ते पाणी जड असू नये. फिल्टर करून हलके केलेले पाणीच शक्यतो वापरा.

पांढऱ्या केसांवर सतत डाय करणे थांबवा.

  • हे करू शकता

बीट

बीटचा रस काढा आणि तो खोबरेल तेलात किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. हे मिश्रण एकजीव करून केसांना व्यवस्थित लावा. केसांना शॉवर कॅपनं झाकून ठेवा आणि तासाभराने केस धुवा. छान गडद शेड मिळेल.

मेंदी

केस रंगविण्यासाठी मेंदी वापरली जाते. मेंदीचे मिश्रण १२ तास भिजू द्या. मेंदी केसांना लावा अन् शॉवर कॅपनं किमान दोन तास मेंदी लावलेले केस नीट झाकून ठेवा. दोन तासांनी मेंदी केसांवर रंगेल आणि मग केस धुवा.

कॉफी

अर्धा कप पाण्यात दोन चमचे कॉफीची पावडर टाका. एक कप लिव्ह इन कंडिशनरमध्ये उकळलेलं कॉफीचे पाणी आणि एक चमचा कॉफीच्या बिया मिसळा. तयार झालेलं मिश्रण केसांना लावा. एका तासाने केस स्वच्छ धुऊन टाका. कॉफी फार काळ रंग टिकवू शकत नाही. पण, केस लगेचच रंगवायचे असतील तर ऐनवेळी हा उपाय करा.

केस काळे करण्याची शक्य असल्यास नैसर्गिक मेंदीचा वापर करणे हितावह. केस काळे करण्यासाठी आजकाल बाजारात अनेक हेअर डाय उपलब्ध आहेत. हेअर डायमधील अमोनिया आणि पीपीडी यांसारख्या घटकांमुळे जास्त इजा होत असते. शक्यतो हेअर कलर निवडताना ज्यामध्ये अमोनिया आणि पीपीडी यांची मात्रा कमी आहे, असे हेअर डाय निवडावे. केस काळे करण्याआधी हेअर डाय निवडताना आदल्या दिवशी कानाच्या मागे त्वचेवर हेअर डाय वापरून त्याची काही आपल्याला एलर्जी होत नाही ना, याची खात्री करूनच मग दुसऱ्या दिवशी केस कलर करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT