व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व...
प्रेमाचा महिना म्हणजेच फेब्रुवारीमधील 'व्हॅलेंटाइन डे' (Valentine Day) आहे. या महिन्यात कपल्स त्यांच्या मनातील भावना व्यक्त करतात. प्रेम करणारे कपल्स 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी ते व्हॅलेंटाईन वीक एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतात. या आठवड्यातील प्रत्येक दिवस खास असतो. यासाठी कपल्स खूप आधीपासून प्लॅनिंग करायला लागतात.
व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व असते आणि गिफ्ट्स देखील दररोज बदलेले जातात. ज्याद्वारे आपण आपल्या पार्टनरपर्यंत आपले मनातील फिलींग पोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे टेडी डे (Teddy day) आज (ता. 10) फेब्रुवारीला आहे. या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर किंवा मैत्रिणीला टेडी बेअर भेट देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात.
तुम्हाला बाजारात अनेक रंगांचे टेडी बियर मिळतील. पण तुम्हाला माहित आहे का, की प्रत्येक रंगाचे स्वतःचे असे महत्त्व असते. गुलाबाच्या रंगांप्रमाणेच टेडी बियर मध्येही तुम्ही तुमच्या पार्टनरला कोणत्या रंगाचा टेडी भेट द्याल.
आय लव्ह यू फॉरएव्हर - जर लाल रंगाच्या टेडीला लाल हृदयाचा आकार असेल.
आय लव्ह यू - हृदयाच्या आकारात लाल रंगाचा टेडी.
गुलाबी रंगांचा टेडी- जर तुमचे थोडेसे प्रेम असेल तर याचा अर्थ प्रेमाची सुरुवात आहे.
पिवळ्या रंगांचा टेडी- याचा अर्थ तुम्ही कोणालातरी मिस करत आहात.
दोन लाल रंगांचे टेडी- म्हणजे तुम्हाला लाँग ड्राईव्हवर जायचे आहे किंवा तुमच्या पार्टनरसोबत चित्रपट बघायचा आहे.
पिवळ्या रंगांचे तीन टेडी- याचा अर्थ तुमची मैत्री पूर्णपणे घट्ट आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.