Valentine Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Valentine Day 2024 : 'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल बनवायचा आहे? मग, अशा पद्धतीने जोडीदाराला द्या सरप्राईज

जगभरात दरवर्षी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन डे च्या आधी जवळपास आठवडाभर प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Valentine Day 2024 : जगभरात दरवर्षी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या प्रेमाच्या दिवसाआधी जवळपास आठवडाभर प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. ज्यामध्ये रोझ डे, प्रपोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे इत्यादी प्रकारचे दिवस साजरे केले जातात. त्यानंतर, व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.

जे कपल्स एकमेकांवर नितांत प्रेम करतात. त्यांना हा व्हॅलेंटाईन डे खास प्रकारे साजरा करायचा असतो. जेणेकरून त्यांचा जोडीदार खूश होईल आणि त्यांच्यातील नाते आणखी घट्ट होईल. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही व्हॅलेंटाईन डे विविध प्रकारे साजरा करू शकता.

व्हॅलेंटाईन डे साठी तुम्ही देखील तुमच्या पार्टनरला गोड सरप्राईज देऊन खुश करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोड सरप्राईजच्या आयडियाज सांगणार आहोत.

कॅंडल लाईट डिनर करा प्लॅन

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही निवांत क्षण घालवण्यासाठी कॅंडल लाईट डिनरचा प्लॅन करू शकता. कॅंडल लाईट डिनरमुळे तुम्हाला एकमेकांना सोबत छान वेळ घालवता येईल.

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला रात्रीच्या जेवणासाठी बाहेर नेऊ शकत नसाल, तर घरच्या घरी मेणबत्तीच्या प्रकाशात रोमॅंटिक वातावरण तयार करू शकता आणि सोबत वेळ घालवू शकता. हे गोड सरप्राईज तुमच्या पार्टनरला नक्की आवडेल, यात काही शंका नाही.

जोडीदारासाठी बनवा जेवण

असे म्हटले जाते की, हृदयापर्यंत पोहचण्याचा मार्ग हा पोटातून जातो. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या पार्टनरचे मन जिंकून घेण्यासाठी मस्त जेवण बनवू शकता. जोडीदाराच्या आवडीची कोणतीही एखादी डिश तुम्ही स्वत:च्या हाताने बनवू शकता.

जोडीदाराला सरप्राईज देण्याचा आणि तिचे किंवा त्याचे मन जिंकून घेण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या पत्नीसाठी, प्रेयसीसाठी जर तुम्ही छान स्वयंपाक बनवलात तर ते त्यांना नक्कीच आवडेल. यामुळे, तुमचा जोडीदार तर खुश होईलच शिवाय, तुमच्यातील नाते आणखी घट्ट होईल.

एकमेकांना भेटवस्तू द्या

हृदयातील भावना व्यक्त करण्याचे काम भेटवस्तू करते, असे म्हटले जाते. कोणत्याही खास प्रसंगी भेटवस्तू देऊन तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रभावित करू शकता. व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही तुमच्या पार्टनरला आवडणारी कोणतीही एखादी भेटवस्तू देऊ शकता.

यामुळे, पार्टनरच्या चेहऱ्यावर सुंदर स्माईल येईल आणि तुमचे नाते आणखी घट्ट होण्यास मदत होईल. भेटवस्तू ही महाग किंवा स्वस्त असणे महत्वाचे नाही तर त्याद्वारे तुमच्या भावना व्यक्त होणे महत्वाचे आहे. हे जरूर लक्षात ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT