Vijay_Trisha_96 
लाइफस्टाइल

व्हॅलेन्टाईन स्पेशल : अजून 96 नाही पाहिला? काय राव!

आशिष नारायण कदम

Valentine Day Special: पुणे : ४ ऑक्टोबर  २०१८ रोजी रिलीज झालेली ९६ ही मूव्ही लाखोंच्या आयुष्याशी जोडली गेली आहे. ही मूव्ही नसून एक इमोशन आहे, जी शब्दात व्यक्त करता येणार नाही. हिरोगिरी, आयटम साँग, सुपरडुपर हिट डायलॉग्ज असं काहीही या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार नाही, पण प्यार, लव्ह, इश्क, मोहब्बत या संबंधी जेवढं काही तुम्ही ऐकलं, पाहिलं असेल, ते सगळं तुम्हाला ९६ मध्ये दिसेल. आपल्या आजूबाजूला रोज घडणाऱ्या गोष्टी या चित्रपटात असल्याने प्रेक्षक लगेच ९६शी कनेक्ट होतात. आणि तसा ९६ हा माझाही फेव्हरेट मूव्ही आहे. तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता 'मक्कल सेल्वान' विजय सेथुपती आणि अभिनेत्री त्रिशाची केमिस्ट्री तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देते. आजच्या जनरेशन नेक्स्टसाठी प्रेम म्हणजे 'लव्ह आज कल' असतं, पण हा मूव्ही तुमच्या प्रेमाच्या व्याख्या बदलून टाकतो. चित्रपटाबद्दल लिहावं तेवढं कमी आहे.

ट्रॅव्हल फोटोग्राफर राम (विजय सेथुपती) आणि जानू (त्रिशा कृष्णन) यांची ही कहानी. हा चित्रपट तुम्हाला १९९६च्या काळात घेऊन जातो, ज्या काळात शाळेत शिकणाऱ्या एखाद्या मुलाचं त्याच्या वर्गातील एका मुलीवर प्रेम आहे, हे सांगण्यासाठी किती वर्ष लागतील हे सांगता येत नव्हतं. वर्गात चोरून बघणं, ती समोर आली की श्वास घ्यायला त्रास होणं, छाती भरून आल्यासारखं होणं, मित्रांनी तिच्या नावानं चिडवणं अशा गोष्टी घडत होत्या.

शाळेत एका मुलीवर जडलेलं प्रेम, दहावीनंतर त्यांच्या वाटा वेगळ्या होणं आणि पुन्हा २२ वर्षांनी रियुनियनवर दोघांची भेट होणं अशी ९६ची छोटीशी स्टोरी आहे. पार्टी झाल्यानंतर या दोन्ही लव्हबर्ड्समध्ये जुन्या आठवणींवरून चर्चा होते. आणि मूव्ही फ्लॅशबॅकमध्ये जातो. पुढे राम आणि जानू एकत्र येतात की नाही, यासाठी चित्रपट नक्की पाहा. 

- दिग्दर्शक सी. प्रेमकुमार यांचा हा डेब्यू तमिल चित्रपट ठरला. त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहली असून दिग्दर्शनही केलं आहे. सी. प्रेमकुमार यांनी ९६ आधी बऱ्याच चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आहे.  

- तमिळ इंडस्ट्रीतील नावाजलेले दिग्दर्शक मणिरत्नम यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रेमकुमार यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून कारकीर्दीला सुरवात केली. पासंगा हा त्यांचा पहिला चित्रपट. २०१२ मध्ये आलेल्या विजयच्या नादुवुला कोंजम पकथ्थ कोन्नममध्येही सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं होतं आणि प्रेमकुमार यांना तमिळमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली. यामुळे विजयसोबत त्यांची चांगली मैत्रीही झाली. 

- २०१५ मध्ये चेन्नईत आलेल्या पुरावेळी प्रेमकुमार २० दिवस घरातच अडकून पडले होते. त्यावेळी त्यांनी ९६ची गोष्ट लिहण्याचं ठरवलं. याची आयडिया त्यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या हायस्कूलच्या रियुनियनमुळेच आली होती. प्रेमकुमार यांना या पार्टीमध्ये जाता आलं नाही, पण या पार्टीमध्ये नक्की काय झालं याची माहिती त्यांच्या मित्रांनी त्यांना दिली होती. पार्टीत विशेष असं काही झालं नव्हतं. एकदम साध्या पद्धतीने ही पार्टी झाली होती, पण शाळेत असताना एकमेकांवर प्रेम करणारे दोघे रियुनियनमुळे एकमेकांना भेटले होते आणि त्यांचीच चर्चा या पार्टीनंतर होत होती. हा लव्ह अँगल प्रेमकुमार यांना क्लिक झाला आणि त्यांनी चित्रपटासाठी स्क्रिप्ट लिहायची असं ठरवलं. प्रेमकुमार यांनी विजय सेथुपतीला डोळ्यासमोर ठेवूनच ही स्क्रिप्ट लिहली होती. कारण विजयचे स्ट्राँग पॉईंट्स त्यांना माहित होते आणि इतर कोणताही अभिनेता त्यांच्या या कथेला न्याय देईल, असं त्यांना वाटत नव्हतं. मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्रिशाआधी मंजू वारियारच्या नावाची चर्चा होती, पण जानूच्या रोलसाठी लूक टेस्ट घेतल्यानंतर त्यांनी त्रिशाची निवड केली.

- प्रेमकुमार यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहून झाल्यानंतर ती सर्वात आधी विजयला ऐकवली. स्क्रिप्ट आवडल्याने विजयने प्रेमकुमार यांनाच या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा हट्ट धरला होता. विजयच्या या हट्टापुढे प्रेमकुमार नाही म्हणू शकले नाहीत. 

- प्रेमकुमार यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना चित्रपटाशी कनेक्ट करण्याचं ठरवलं. स्वत: प्रेमकुमार हे ९६ बॅचचे पासआऊट आहेत. त्यांचं बालपण कुंभकोणममध्ये गेलं असल्यानं चित्रपटाचा बराचसा भाग या परिसरात शूट करण्यात आला आहे. 

- या चित्रपटाच्या मूळ स्क्रिप्टमध्ये ७ दिवसांची कथा लिहण्यात आली होती, पण नंतर फायनल स्क्रिप्टमध्ये प्रेमकुमार यांनी या चित्रपटाची कथा एका रात्रीत घडत असल्याचं दाखवण्याचा निर्णय घेतला. 

- आणखी एक गोष्ट म्हणजे त्रिशाने या चित्रपटात घातलेला पिवळ्या रंगाचा कुर्ता फॅशन ट्रेंड बनला होता. चित्रपटाच्या यशानंतर अशा प्रकारच्या कुर्त्यांची डिमांड वाढली होती. 

- ७ फिल्मफेअर अॅवॉर्डसाठी या चित्रपटाला नॉमिनेशन मिळालं होतं. त्यापैकी ६ फिल्मफेअरवर या चित्रपटानं नाव कोरलं होतं. बेस्ट फिल्म, बेस्ट अॅक्टर, बेस्ट अॅक्ट्रेस, बेस्ट रायटर, बेस्ट म्युझिक डायरेक्टर आणि बेस्ट प्लेबॅक सिंगर. आणखी ढीगभर पुरस्कारही ९६ला मिळाले आहेत. 

- प्रसिद्ध व्हायोलिन वादक गोविंद वसंथा यांनी या चित्रपटाला म्युझिक दिलं. ९६ हा त्यांचा तिसराच प्रोजेक्ट होता. मुख्य गाणी आणि बॅकग्राउंड स्कोअरही गोविंद यांनीच दिला आहे. चित्रपटातील सगळीच गाणी हिट आहेत. पण 'कादले' हे गाणं ब्लॉकबस्टर ठरलं. या गाण्याची अनेक व्हर्जन्स तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळतील. अनेकांनी आपल्या मोबाईलची रिंगटोन म्हणून या गाण्याला पसंती दिली आहे. 

- १८ कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने वर्ल्डवाईड ६३ कोटींहून अधिक कमाई केली आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आयएमडीने या चित्रपटाला ८.६ रेटिंग दिलं आहे. 
- या चित्रपटाचे कन्नड (९९) आणि तेलुगूमध्ये (जानू) रिमेक बनवण्यात आलेले आहेत. 
- एस. नाथगोपाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट यू-ट्यूबवर (हिंदी) उपलब्ध आहे.

(व्हिडिओ सौजन्य: YouTube)

- व्हॅलेंटाइन स्पेशल आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT