Valentines Week 2024 Sakal
लाइफस्टाइल

Valentines Week 2024 : 7 फेब्रुवारीपासून प्रेमाचा आठवडा सुरू, पाहा 'व्हेलेंटाईन वीक'ची लिस्ट

Full List from 7 to 14 Feb, Valentine’s Day Calendar; व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोज डेपासून व्हॅलेंटाईन डेपर्यंत कोणता दिवस कधी साजरा केला जाईल जाणून घेऊया.

Aishwarya Musale

फेब्रुवारी महिन्यात सुरू होणारा व्हॅलेंटाईन वीक कपल्स वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. व्हॅलेंटाईन डे वीक 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत असतो. हा संपूर्ण आठवडा कपल्ससाठी खूप खास आहे. कपल्स त्यांच्या मनातील भावना एकमेकांना शेअर करतात. आज आम्ही तुम्हाला कोणत्या दिवशी काय साजरं केलं जाणार आहे याबाबत अधिक माहिती देणार आहोत.

रोझ डे (7 फेब्रवारी 2024)

व्हॅलेंटाईन डे वीक 7 फेब्रुवारी म्हणजेच रोज डे पासून सुरू होतो. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना गुलाबाचे फूल देऊन प्रेम आणि काळजी व्यक्त करू शकता. गुलाब ही प्रेमाची सुरुवात मानली जाते. या दिवशी जोडपे आपल्या जोडीदाराला वेगवेगळ्या रंगाचे गुलाब देतात. (Rose Day - 7th February 2024)

प्रपोज डे (8 फेब्रवारी 2024)

8 फेब्रुवारी रोजी प्रपोज डे साजरा केला जातो. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट सांगण्यासाठी हा दिवस उत्तम ठरतो. प्रपोज करताना तुम्ही केक, फुलं, एखादी रिंग किंवा त्या व्यक्तीची आवडती वस्तू देऊ शकता. (Propose day - 8th February 2024)

चॉकलेट डे (9 फेब्रवारी 2024)

व्हॅलेंटाईन डे चा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. हा दिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना चॉकलेट देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. चॉकलेटचा गोडवा नात्यात गोडवा वाढवतो. (Chocolate Day - 9th February 2024)

टेडी डे (10 फेब्रवारी 2024)

व्हॅलेंटाईन डे चा चौथा दिवस म्हणजेच टेडी डे 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी, कपल्स एकमेकांना टेडी बियर गिफ्ट करतात. वेगवेगळ्या रंगांच्या टेडीजचेही वेगवेगळे अर्थ आहेत. (Teddy Day - 10th February 2024)

प्रॉमिस डे (11 फेब्रवारी 2024)

11 फेब्रुवारी रोजी प्रॉमिस डे साजरा केला जातो. या दिवशी, तुम्ही तुमच्या जोडीदाराला सदैव तुमच्यासोबत राहण्याचे, त्यांना आनंदी ठेवण्याचे आणि बरेच काही वचन देऊ शकता. (Promise Day - 11th February 2024)

हग डे (12 फेब्रवारी 2024)

12 फेब्रुवारीला हग डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपे आपल्या जोडीदाराला मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात. अनेकदा लोक एकमेकांना मिठी मारून आपल्या भावना व्यक्त करतात. (hug day - 12th February 2024)

किस डे (13 फेब्रवारी 2024)

13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. या दिवशी आपल्या पार्टनरसोबत असलेले नातेसंबंध मजबूत बनवण्याचा दिवस मानला जातो. (kiss day - 13th February 2024)

व्हॅलेंटाईन डे (13 फेब्रवारी 2024)

हा दिवस 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस जोडप्यांसाठी खूप खास असतो. बहुतांश जोडपी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत चांगला वेळ घालवू शकता.  (Valentine's Day - 14th February 2024)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT