V-Day Sakal. 
लाइफस्टाइल

Valentine Week Special: प्रेमाचा वाढदिवस...

प्रियंका देशमुख

कुठलंही नातं सहज समृध्द होत नाही. नात्याचाही एक प्रवास असतो जो खूप सुंदर असतो तो जगायचा असतो अनुभवायचा असतो. आता हे त्या दोघातलं प्रेमाचंच नात घ्याना.... 

दोन अनोळखी व्यक्ती एका पूर्ण आयुष्यासाठी एकत्र येतात.... नात्याची सुरवात होताना ते एक छोटंसं रोपटं असतं ज्याचं आपल्याला एका वृक्षात रूपांतर करायचं असतं. 
जेव्हा ते रोपटं असतं तेव्हा त्याला खत पाणी घालायला मित्र मंडळी आघाडीवर असतात. पण त्या प्रेमाच्या  रोपट्याच जेव्हा वृक्षात रूपांतर होत तेव्हा मात्र  ऊन, वारा, पाऊस गुलाबी थंडी सगळं ज्याचं त्यालाच सोसायच असत... या दोघांनी तेच केलं मित्रांनी प्रेमाच्या रोपट्याला खत पाणी घातलं म्हणून त्यांचं नातं समृद्ध झालं नाही,  तर त्यांनी एकमेकांसोबत घालवलेला वेळ जगलेले क्षण दिलेली कमिटमेंट या सगळ्या नात्यातल्या बारीक सारीक गोष्टीने त्यांनी त्यांचं नात समृध्द केलं.

मला माझ्या आयुष्यात तुझ्या बाबतीत कुठलीच तडजोड करायची नाही तेव्हा तूच या आपल्या नात्याचं भविष्य ठरव... अस म्हणून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. आज त्याच नात्याचा वाढदिवस...

Love Matters: प्रेम म्हणजे एकमेकांच्या आयुष्याचा 'कॉपीराईट' नाही

त्याचे ऑफिस सुटले अन् त्याने आपल्या मैत्रीणीला-प्रियसीला फोन केला. दिवसभराच्या ओढाताणीनंतर देखील तो तिला भेटण्यासाठी तेवढाच उत्सुक होता जेवढा काल होता. रोजच असतो. दररोजच संध्याकाळी जसं उन्हं सावलीला बिलगतात, तसे ते जवळ येतात, एकमेकांना भेटतात. हो.. अगदी तसेच.. धरती क्षितिजाला कातरवेळी भेटते तसेच ते रोज भेटतात...एकमेकांच्या हातात हात धरून तास न् तास आपलं प्रेम आणखी समृद्ध करतात, वृद्धींगत करतात. 

त्याचा भेटीचा नित्य दिन ठरलेला आहे. ती बाग.. आणि त्या बागेतली ती जागा.. फक्त त्या दोघांसाठीच बनली आहे का असा कधी तरी प्रश्न पडतो. आज पण त्याने आपल्या प्रियेला फोन केला. तिला अजून बाहेर पडायला अर्धा तास वेळ होता. विस्कटलेले केस, झेंगारलेले डोळे, चेहऱ्यावरची थकावट, टायची सोडलेली नाॅट आणि अस्ताव्यस्त इन-शर्ट अश्या काहीश्या कंटाळलेल्या मुडमध्ये आणि गबाळ्या अवस्थेत तो बागेत पुढे गेला व बाकावर बसून तो तिची वाट पाहू लागला.

आवडत्या व्यक्तीच्या सहवासात वेळ कधी आणि कसा हे गेला कळत नाही. पण त्याच आवडत्या व्यक्तीच्या प्रतिक्षेत काळ नकोसा वाटतो. त्याचा वेळ जाता जात नव्हता. एक एक सेंकदाने पुढे सरकणारा वेळ त्याला जाणवत होता. आपल्या प्रत्येक हालचालीवर जगाला आपल्या तालावर नाचवणाऱ्या सेकंद काट्याचे तो सतत निरीक्षण करत होता. हातावर हात घासून येणारा वेळ घालवत होता. पायाच्या अंगठ्याने  उगाच बागेतल्या त्या हिरव्या गवताला त्रास देत होता.

तेवढ्यात ती बागेत त्याच्यासमोर आली. आणि तिला पाहताच तो जागचा उडाला. डोळ्यांच्या बुबळांची कसलीच हालचाल न करता त्याचे डोळे तिच्याकडे स्थिरावले होते. जसे पाण्यात पडलेल्या सुर्याचे सुंदर प्रतिबिंब पाहून आपण मंत्रमुग्ध होतो तसाच तो तिचे आजचे लावण्य पाहून मंत्रमुग्ध झाला. रोजच सुंदर दिसणारी ती आज त्याला आणखी सुंदर दिसत होती. 

मोकळे केस, गोरापान वर्ण, टोकदार नाक, डोळ्यावर तिच्यासारखाच गोड दिसणारा चष्मा, डोळ्यावरुन गालावर आलेली बट, केशरी पंजाबी ड्रेस आणि त्यावर फिकट्ट पांढरश्या रंगाची ओढणी. तिचे हे रुप पाहून आज तो अक्षरशः मोहुन गेला होता. ती त्याच्या शेजारी येवून बसली तरीही अद्याप हे महाशय उभेच होते. 

Valentine Week: 'रोज डे'निमित्त जोडीदाराला गुलाब देण्यापूर्वी हे...

तिला जवळ ओढून तिच्या ओठावर ओठ टेकवण्यासाठी तो थोडासा पुढे सरसावला. पण काही क्षणातच थांबला. आवडलेलं फुलं तोडण्यापेक्षा बागेत झाडावरच छान दिसतं. प्रेम यालाच तर म्हणतं, असा काहीसा विचार करून त्याच्या मनोमन त्याने स्मित केलं आणि तिने ते टिपलं. पण त्या सुंदर दिसणाऱ्या फुलाच्या पाकळ्यांना स्पर्श करण्याचा मोह तो आवरु शकला नाही. त्याने अलगद तिच्या गालावर आपले ओठ टेकवले.

ती थोडशी बावरली आणि लाजेने लाल होवून ओढणीचे चाळे करत इकडे-तिकडे पाहू लागली. त्याने तिच्या हातावर हात ठेवत डोळ्यानेच 'मी कायम तुझ्यासोबत आहे' चा विश्वास दिला. तशी तीने त्याला एका विश्वासाने मिठी मारली. 

आज त्यांच्या प्रेमाचा वाढदिवस होता. तसा तो लक्षात नसल्याने काहीसा ओशाळला. मात्र तरीही आज त्याला सर्वत्र तिच दिसत होती. त्याला तिच्यासोबत असताना आपलं अस्तित्वहीन होण  मान्य होत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT