Valentine Week : फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हटलं जातं, कारण यात व्हॅलेंटाइन वीक येतो. सध्या व्हॅलेंटानइन विक सुरू आहे आणि दोन दिवसावर व्हॅलेंटाइन डे आला आहे. अशा गुलाबी वातावरणात काही खऱ्या प्रेम कहाण्या अगदी तुम्हालाही हेवा वाटाव्या अशा ऐकल्यात का? आजवर तुम्ही सिनेमात, गोष्टीत अनेक लव्हस्टोरीज ऐकल्या, पाहिल्या असतील. पण या रियल लाइफ स्टोरीज तुम्ही ऐकल्या आहेत का?
बऱ्हाणपूरमध्ये बांधला ताजमहल
मध्यप्रदेशातल्या बऱ्हाणपूरमध्ये आग्राच्या ताजमहल सारखीच एक इमारत उभारली गेली आहे. ही इमारत आनंद प्रकाश चौकसे यांनी आपली पत्नी मंजूषा चौकसे हिच्यासाठी बनवली आहे दिसायला एकदम आग्राच्या ताजमहल सारखा आहे पण आकाराने लहान आहे. पण खऱ्या ताजमहल एवढाच आकर्षक आहे. बरेच लोक बऱ्हाणपूरच्या या ताजमहलला बघायला जातात.
चौकसे सांगतात त्यांच्या या घराच्या आसपास तेल, इंक, तूप, फिनाइल सारख्या गोष्टी बॅन आहेत. घराच्या स्वच्छतेसाठी ते फक्त आरओ वॉटर वापरतात. त्यांचा ताज आग्राच्या मूळ ताजपेक्षा जास्त चमकदार आहे. यात चार बेडरूम, किचन, लायब्ररी, मेडिटेशन रुम, मोठा हॉल आहे.
आणि विशेष बाब म्हणजे खरा ताजमहल पण पहिले बऱ्हाणपूरमध्येच बनणार होता.
पत्नीच्या आठवणीत बनवला पुतळा
कर्नाटकचे उद्योजक श्रीनिवास गुप्ता यांनीपण आपल्या पत्नीच्या आठवणीत असच काहीतरी कारनामा केला. ज्याची चर्चा संपूर्ण देशभर रंगली. २०१७ मध्ये गुप्ता यांच्या पत्नीचं एका अपघातात निधन झालं. त्यांचा आठवणीत गुप्ता यांनी शहाजहानसारखा ताजमहल नाही बनवला पण तसंच काहीतरी खास बनवलं. त्यांनी पत्नीच्या आठवणीत एक घर बनवलं आणि तिथे पत्नीचा असा एक पुतळा बनवण्यचं ठरवलं की, तो अगदी खरा वाटावा. त्यांच हे स्वप्न प्रसिद्ध आर्किटेक्ट रंगनान्नवर यांनी पूर्ण केलं. त्यांनी श्रीधर मूर्ती यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. पुतळा तयार व्हायला एक वर्ष लागलं. तो मुलींनी सजवला. जेव्हा त्यांच्या नव्या घराचा गृहप्रवेश झाला तेव्हा माधवीचा पुतळा बघून लोक आश्चर्य करत राहीले. कारण पुतळा अगदी असली वाटत होता.
प्रेयसीला १० वर्ष लपवून ठेवलं
केरळच्या पलक्कड गावातल्या रेहमान आणि सजिता यांची प्रेम कहाणीपण अशीच अनोखी आहे. रेहमानने प्रेमिका सजिताला १० वर्ष गावातल्या एका लहानशा खोलीत लपवून ठेवलं होतं. याची भनकसुध्दा कोणाला लागू दिली नाही. असं करण्यामागचं कारण म्हणजे प्रेयसा दुसऱ्या धर्माची होती आणि घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. पण मग २०२१ मध्ये त्यांनी जगासमोर येण्याचा निर्णय घेतला आणि कोर्ट मॅरेज केलं. २०१० मध्ये सजिताच्या घरच्यांनी तिची मिसिंग कंप्लेंट केली होती. पण पोलीसांना काही पत्ता लागला नाही. मग आई वडिलांनी तिला मृत समजून सोडून दिलं. १० वर्ष त्यांनी लपून छपून काढले.
रेहमान सांगतात की, बऱ्याचदा त्यांना उपाशी झोपावं लागलं. लग्नानंतर जगासमोर वावरत असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. रेहमानच्या घरच्यांनी सजितावर धर्म बदलण्याचा दबाव आणला पण रेहमान यासाठी तयार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.