Valentine Week : सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू आहे. सध्या प्रपोज डे, प्रॉमिस डे, टेडी डे कपल्स साजरा करत आहे. आपल्या पार्टनरला (Partner) कधी फूल देऊन, कधी गिफ्ट देऊन, कधी प्रेमाने मिठ्ठी(Hug) मारून आपले प्रेम व्यक्त केले जाते.
Hug Day दिवशी लोक एकमेकांसाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी गळाभेट घेतात. त्यामुळे फक्त गळाभेट देणाराच नाही तर घेणाऱ्याला देखील चांगले वाटते. कारण छोटे असो की मोठे, सुख- दुख आपण जवळच्या माणसाला, ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांची आपण सहज गळाभेट देत असतो. पण तुम्हाला माहितीये का, एक मिठ्ठी देऊन तुम्हाला हजारो रुपये कमवता येऊ शकतात. विदेशामध्ये या गळाभेटीची किंमत आजकाल काही प्रोफेशनल वसूल करत आहे.
लोकांना गळाभेट देण्याचा व्यावसायिक पेशा काही पश्चिमात्य देशांमध्ये सुरू झाला आहे. अनोळखी लोकांना गळाभेट देऊन पैसे कमावणाऱ्यांना 'कडलर' ( cuddler) असे म्हणतात.
आपल्या देशात (India) मोठ-मोठे कुटुंब असतात जिथे लोक नेहमी एकमेकांना भेटतात किंवा छोट्या-मोठ्या गोष्टींवर फोनवर संवाद साधतात. विदेशामध्ये असे होत नाही, तिथे लोक एकटेपणाच्या विळख्यात सापडलेले असतात. अशा वेळी त्यांना अशा व्यक्तीची (Professional Cuddler) गरज असते की जो त्यांना गळाभेट देऊन त्यांचा एकटेपणा दूर करेल आणि बरे वाटावे म्हणून मदत करेल. याच कल्पनेतून पैसै घेऊन गळाभेट देण्याच्या व्यवसायाची सुरूवात झाली.
फक्त महिला किंवा फक्त पुरुष, लोकांना गळाभेट देण्याचे काम करतात असे नाही. या व्यवसायामध्ये महिला-पुरुष दोघेही आहेत, जे आपल्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेशनसाठी पैसे घेतात. ग्राहकांना ज्या भावनात्मक मदतीची गरज असते त्यासाठी व्यावसायिक कडरल मदत करतात. पण या व्यावसायिक पेशाचे काही नियम गळाभेट देणारा व्यक्ती ठरवितो, जे तोडण्याची परवानगी ग्राहकांना नसते. हात पकडून, डोक्यावरून हात फिरवून, गळाभेट देऊ आणि कित्येकदा गळाभेट देऊन झोपवणे अशा सेव दिल्या जातात. यामध्ये सक्त सुचना असते की, ग्राहक आधी सांगितलेल्या अटींशिवाय वेगळी कोणतीही मागणी करू शकत नाही.
आता तुम्ही विचार करत असालस की, ही कसली नोकरी? पण तुम्हाला माहितीये का, या कामाचे पैसे किती मिळतात? एक गळाभेट देणारा प्रोफेशनल एक तासामध्ये कमीत कमी ६-७ हजार रुपये कमावू शकतो, तर काही लोक १५-१६ हजार रुपये घेतात. हे सेशन १ ते ३ तास सुरू असते आणि त्यानुसार पैसे वाढविले जातात. या प्रोफेशनल कडलर्सकडे येणाऱ्या लोकांमध्ये ब्रेक-अपच्या दुखाचा सामना करणारे लोक असतात. त्यांना मिळणाऱ्या समाधानातून हे व्यवासायिक लोक पैस कमावितात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.