Valentines Day 2024 : सध्या सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन डे’ ची धामधूम पहायला मिळत आहे. अवघ्या २ दिवसांवर हा दिवस येऊन ठेपला आहे. १४ फेब्रुवारीला जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. हा व्हॅलेंटाईन डे स्पेशल करण्यासाठी अनेक कपल्स विविध प्रकारचे प्लॅन्स बनवतात.
काही कपल्स फिरायला जातात तर काही कपल्स कॅंडल लाईट डिनरचा ही प्लॅन करतात. यंदाच्या 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर, हा लेख शेवटपर्यंत वाचा. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही बजेटफ्रेंडली ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. तिथे जाऊन तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे छान प्रकारे साजरा करू शकता.
मेघालय या राज्याची राजधानी असलेले शहर शिलाँग हे तिथल्या अनोख्या निसर्गसौंदर्यासाठी आणि खाद्यसंस्कृतीसाठी खास करून ओळखले जाते. या शहरातील पर्यटनस्थळांना अनेक देशी-विदेशी पर्यटक दरवर्षी भेट देतात.
उंच डोंगरावर वसलेले हे शहर अनेक पर्यटकांना भुरळ घालते. या ठिकाणी भेट देण्यासाठी फेब्रुवारी हा उत्तम काळ आहे. शिलाँगमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत, जिथे तुम्ही भेट देऊन जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवू शकता.
आंध्र प्रदेश या राज्यातील हे एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही पार्टनरसोबत या ठिकाणी जाऊन तुमचा ‘व्हॅलेंटाईन डे’ चांगल्या प्रकारे साजरा करू शकता. येथील नयनरम्य नजारा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. होशर्ली हिल्स हे ठिकाण समुद्रपाटीपासून १२६५ मीटर उंचीवर आहे. याशिवाय, तुम्हाला येथे जोडीदारासोबत ट्रेकिंगचा ही आनंद घेता येईल.
उत्तराखंड या राज्याचे नाव घेतल्यावर तिथली अनेक पर्यटनस्थळे आपल्याला आठवतात. या पर्यटन स्थळांपैकी ऋषिकेशचे नाव हे सर्वात आघाडीवर आहे. या ठिकाणचा उल्लेख केल्याशिवाय उत्तराखंड पूर्ण होऊच शकत नाही, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
जर तुमच्या जोडीदाराला राफ्टिंग आणि ट्रेकिंगची आवड असेल, तर तुम्ही या ठिकाणी जाण्याचा नक्कीच विचार करू शकता. उंचावर वसलेले हे ठिकाण निसर्गसंपन्न असून येथील दऱ्याखोऱ्यांमधील नजारा नयनरम्य आहे. या ठिकाणी तुम्हाला जी शांतता मिळेल ती दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. यात काही शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.