Valentines Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Valentines Day 2024 : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला दिसायचय छान? मग, ‘या’ पद्धतीने करा मेकअप, दिसाल ब्युटीफूल..!

'व्हॅलेंटाईन्स डे' च्या दिवशी परफेक्ट लूक करण्यासाठी तरूणी रेड आऊटफीट किंवा विविध रंगाच्या कपड्यांची निवड करतात. कपड्यांची निवड झाल्यानंतर स्पेशल मेकअप लूक करण्यावर तरूणींचा भर असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Valentines Day 2024 : आज जगभरात 'व्हॅलेंटाईन्स डे' चा मोठा उत्साह सर्वत्र पहायला मिळत आहे. या व्हॅलेंटाईन्स डे च्या आठवडाभर आधी विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात. या आठवड्याला ‘व्हॅलेंटाईन्स वीक’ असे ही म्हटले जाते. या व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये रोझ डे, चॉकलेट डे, प्रपोझ डे, प्रॉमिस डे, टेडी डे, हग डे इत्यादी अनेक दिवस साजरे केले जातात.

व्हॅलेंटाईन्स डे खास प्रकारे साजरा करण्यासाठी अनेक कपल्स विविध प्रकारचे प्लॅन्स बनवतात. हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी अनेक कपल्स फिरायला जाण्याचा किंवा कॅंडल लाईट डिनरचा ही प्लॅन करतात.

या खास दिवशी परफेक्ट लूक करण्यासाठी तरूणी रेड आऊटफीट किंवा विविध रंगाच्या कपड्यांची निवड करतात. कपड्यांची निवड झाल्यानंतर स्पेशल मेकअप लूक करण्यावर तरूणींचा भर असतो. त्यासाठीच्या खास टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या मेकअप टिप्स फॉलो करून, तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराचे मन जिंकून घेऊ शकता.

स्किनटोननुसार बेसची करा निवड

व्हॅलेंटाईन डे च्या डेटसाठी तयार होताना तरूणींनी बेसची खास काळजी घेणे गरजेचे आहे. चेहऱ्यावर मेकअप बेस लावताना तुमच्या स्किनटोननुसार त्या बेसची निवड करा. जर असे झाले नाही आणि तुम्ही भलताच मेकअप बेस लावला तर तुमचा मेकअप बिघडू शकतो.

त्यामुळे, हा मेकअप बेस चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी चेहऱ्यावरील डाग, डार्क सर्कल्स झाकण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून बेसच्या खाली ते झाकले जातील. त्यानंतर, संपूर्ण चेहऱ्यावर फाऊंडेशन लावा.

ब्लश आहे महत्वाचा

'व्हॅलेंटाईन्स डे' च्या दिवशी जर तुम्हाला परफेक्ट मेकअप लूक हवा असेल, तर त्यासाठी ब्लश फार महत्वाचा आहे. तुम्ही जर आज पार्टीवेअर आऊटफीट परिधान करणार असाल तर, तुमच्या आऊटफीटला मॅच होणारा पिंक, रेड किंवा पीच कलरचा ब्लश लावायला अजिबात विसरू नका. या ब्लशमुळे तुमचा मेकअप आणखी खुलून दिसेल, यात काही शंका नाही. चेहऱ्यावर ब्लशचा वापर केल्यानंतर हायलायटरचा वापर नक्की करा.

आय मेकअप आणि लिपस्टिक

चेहऱ्यावरील मेकअप करण्यासोबतच डोळ्यांचा मेकअप करणे अतिशय महत्वाचे आहे. डोळ्यांचा मेकअप केल्यामुळे तुमचा चेहरा आणखी उठून दिसतो. व्हॅलेंटाईन डे च्या या स्पेशल दिवशी डोळ्यांचा मेकअप करताना काजळ, आय लायनर, आयशॅडो आणि मस्कारा यांचा अवश्य वापर करा.

आयशॅडोजमध्ये पिंक, रेड, गोल्डन, शिमरी, सिल्वर इत्यादी पार्टीवेअर लूकला मॅच होणाऱ्या आयशॅडोजचा वापर करायला अजिबात विसरू नका. डोळ्यांचा मेकअप केल्यानंतर ओठांवर लिपस्टिक लावून तुमचा मेकअप लूक पूर्ण करा. सर्वात आधी ओठांवर लिप ग्लॉस लावा. त्यानंतर, तुमच्या आऊटफीटला मॅच होणारी पिंक, रेड, मरूण किंवा न्यूड लिपस्टिक लावा. शक्यतो डार्क रंगाच्या लिपस्टिकचा वापर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT