Valentines Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Valentines Day 2024 : केरळमधील ‘ही’ सुंदर ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाही; जोडीदारासोबत एकदा नक्की द्या भेट

आज सर्वत्र 'व्हॅलेंटाईन्स डे' चा उत्साह पहायला मिळत आहे. हा दिवस स्पेशल करण्यासाठी अनेक कपल्स विविध प्रकारचे प्लॅन्स बनवतात.

Monika Lonkar –Kumbhar

Valentines Day 2024 : फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणून ओळखले जाते. कारण या महिन्यात ‘व्हॅलेंटाईन्स डे’ सर्वत्र साजरा केला जातो. दरवर्षी १४ फेब्रुवारीला हा व्हॅलेंटाईन्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ‘व्हॅलेंटाईन्स डे’ च्या आठवडाभर आधी व्हॅलेंटाईन्स वीक साजरा केला जातो. या वीकमध्ये विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात.

आज सर्वत्र या व्हॅलेंटाईन्स डे चा उत्साह पहायला मिळत आहे. हा दिवस स्पेशल करण्यासाठी अनेक कपल्स विविध प्रकारचे प्लॅन्स बनवतात. काही जण फिरायला जातात, तर काही जण कॅंडल लाईट डिनरचा प्लॅन करतात.

आजचा हा स्पेशल दिवस साजरा करण्यासाठी आणि जोडीदारासोबत काही सुंदर क्षण घालवण्यासाठी तुम्ही केरळला जाऊ शकता. आज आपण कपल्ससाठी स्पेशल असणाऱ्या केरळमधील काही सुंदर ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

मुन्नार

केरळमधील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ म्हणून मुन्नारला ओळखले जाते. दक्षिण भारतात स्थित असलेले हे ठिकाण पर्यटकांचे आवडते हिलस्टेशन आहे. कपल्ससाठी तर हे एक लोकप्रिय हनिमून डेस्टिनेशन आहे. त्यामुळे, दरवर्षी देश-विदेशातील अनेक कपल्स या ठिकाणी भेट देतात.

व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे. या परिसरातील उंच पर्वत, चहाचे मळे आणि येथील मनमोहक नजारे तुमचा व्हॅलेंटाईन्स डे अविस्मरणीय करतील यात काही शंका नाही.

या परिसरात असलेले अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स जोडप्यांच्या स्वागतासाठी नेहमी सज्ज असतात. मुन्नारला गेल्यावर तुम्ही येथील इको पॉईंट, पोथामेडू व्ह्यूपॉईंट, एराविकुलम नॅशनल पार्क आणि टाटा टी म्युझिअम इत्यादी अनेक ठिकाणे जोडीदारासोबत एक्सप्लोअर करू शकता.

त्रिशूर

केरळची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिशूरचे सौंदर्य तुम्हाला प्रेमात पाडेल, यात काही शंका नाही. या परिसरातील सुंदर तलाव आणि स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. हेच या शहराचे खास वैशिष्ट्य आहे.

येथील छोटे-छोटे डोंगर आणि मधोमध वाहणारे सुंदर धबधबे यांच्यामध्ये व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यात एक वेगळीच मजा आहे. तुम्ह जर निसर्गप्रेमी असाल तर तुम्हाला हे ठिकाण प्रचंड आवडेल.

त्रिशूरला गेल्यानंतर विलंगन कुन्नू, चेट्टुवा बॅकवॉटर, त्रिशूरमधील धबधबे, डोलोर्स बेसिलिका आणि त्रिशूरचे चिडियाघर इत्यादी अनेक ठिकाणे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एक्सप्लोअर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT