Valentines Day esakal
लाइफस्टाइल

Valentines Day : सजना है मुझे सजना के लिये! ट्राय करा क्रिती सॅननचा लुक

फेब्रुवारी आला की सगळ्यांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाइन डेचे

सकाळ डिजिटल टीम

Valentines Day : फेब्रुवारी आला की सगळ्यांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाइन डेचे. या दिवशी रोमँटिक डेट तो बनती है बॉस. आणि मग या डेटसाठी कसं सजायचं याच्या विविध आयडियाजही निघू लागतात. तुम्हाला दिल तो पागल हैमधली माधुरी आठवतेय का? कुणी जोडीदार नसल्याने एकटीच स्वतःसाठी व्हॅलेंटाइनची खरेदी करणारी माधुरी आपल्या अजून लक्षात राहिलीय. तिच्यासारख्याच काही एकट्या मित्रमैत्रिणींनाही या दिवशी मस्त दिसायचंच असतं ना. पण मग त्यांनी काय करायचं? कोणते कपडे घालायचे?

तर व्हॅलेंटाईन डेटवर सुंदर दिसण्यासाठी तुम्ही सेलेब्स स्टाइल फॉलो करायला हरकत नाही. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही डेटवर जाणार असाल किंवा एकटे जरी असाल तर या खास मुमेंटला स्टाइलचा टच देण्यासाठी तुम्ही क्रिती सारखे 4 आऊटफिट ट्राय करू शकता.

या फोटोत क्रितीने ब्लश पिंक रंगाचा ड्रेस घातला आहे ज्यामध्ये ती तिच्या थाईज फ्लॉंट करताना दिसतेय. क्रिती सॅनने थाई हाय स्लिट ड्रेसवर हेअर पोज दिली आहे. तिने तिच्या लूकसाठी खूप कमी मेकअप केलाय. जर तुम्हाला या व्हॅलेंटाईन डेटवर ब्लॅक लुक ट्राय करायचा असेल तर तिचा हा लूक कॉपी करा. तिने यात एक स्लीक पोनीटेल, ड्रॉप गोल्डन इयररिंग्स आणि ब्लॅक हिल्स सोबत ब्लॅक मिडी ड्रेस घातला आहे. क्रिती लूकमध्ये एखाद्या हुस्न परीसारखी दिसते आहे.

जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला इंप्रेस करायचं असेल तर तुम्ही क्रितीचा स्ट्रॅपलेस रेड मिड लेंथ ड्रेस ट्राय करू शकता. ड्रेसवर मॅचिंग हाय हील्स आणि हुप इअररिंग्स तुमचा लुक आणखीन ग्लॅमरस करतील. व्हॅलेंटाईनसारख्या खास दिवशी तूम्ही क्रीतीसारखा व्हाईट ड्रेस सुद्धा ट्राय करू शकता. तिने विंटेज शर्टवर वेगन लेदरचा मिनीस्कर्ट घातला होता. क्रितीने मोठ्या हुप इअररिंगसह लूक कंप्लीट केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT