Varanfal Recipe  esakal
लाइफस्टाइल

Varanfal Recipe : रोजच्या जेवणाला कंटाळला असाल तर बनवा पौष्टीक अन् चवदार वरणफळ

घरी फार कोणी नसतं तेव्हा एकट्याचा स्वयंपाक बनवण्याचा जाम कंटाळा येतो, तेव्हा नुडल्स अन् खिचडीपेक्षा हा पदार्थ बरा

सकाळ डिजिटल टीम

Varanfal Recipe :

कधी-कधी रोजच्या जेवणाचा कंटाळा येतो. तेव्हा आपण हॉटेलच्या चमचमीत जेवणावर ताव मारतो. पण, कधीतरी या हॉटेलच्या चवीचाही कंटाळा येतो. कधी असंही होतं की घरी फार कोणी नसतं तेव्हा एकट्याचा स्वयंपाक बनवण्याचा जाम कंटाळा येतो.

अशावेळी लोक मॅगी, डाळ खिचडी बनवून खातात. तर आम्ही तुम्हाला अशावेळीसाठी एक भन्नाट पर्याय सुचवणार आहोत. तुम्ही वरणफळ हा पदार्थ आज्जीच्या तोंडी नक्की ऐकला असेल. नव्याने ऐकणाऱ्याला हे जरा वेगळंच प्रकरण वाटेल. पण हा पदार्थ खूप सुरेख होतो.

वरण बनवून त्यात चाकोल्य टाकायच्या म्हणजे वरणफळ तयार होतं, असंही अनेकांना वाटू शकतं. पण, तसं नाही. आजारी माणसाला काही खायची इच्छा होत नाही. तेव्हा त्यालाही असेहे वरणफळ बनवून दिलं तर तो आवडीने खातो. त्यामुळेच, आजारपण दूर पळवणारं असं हे पौष्टीक वरणफळ कसं बनवायचं हे पाहुयात.

साहीत्य -

१ वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी तुरीचीडाळ शिजवलेली, अर्धा टी स्पून मेथ्या, थोडी भिजवलेली चिंच कोळून, अर्धा टी स्पून ओवा, चवीनुसार गुळ व मीठ, कढीलिंब, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट.

कृती :

- १ वाटी कणिक थोडं तेल, मीठ व ओवा घालून भिजवून ठेवावी.

- पातेल्यात मोहरी, हिंग, हळद, मेथ्या, कढीलिंब घालून फोडणी करावी. फोडणीत अगदी शेवटी अर्धा चमचा लाल तिखट घालून, लगेच शिजवून घेतलेली तुरीचीडाळ घोटून टाकावी.

- आवश्यकतेनुसार पाणी (जरा पातळ ठेवावी) चिंचेचा कोळ, गुळ, मीठ, कोथिंबीर घालून आमटी उकळू द्यावी (४) कणकेच्या पुरी एवढ्या लाट्या करून हाताने किंवा बोटाने

- थोड्या पातळ व चपट्या करून आमटीच्या उकळीत सोडाव्यात सर्व कणकेची चपटी फळ घालून झाली की गॅस मंद करून झाकण ठेवून आमटी उकळून त्यातील कणकेची फळ शिजू द्यावीत

- शिजल्यावर आमटी (वरण) दाटसर होते. खायला देताना खोलगट बशीत साजूक तूप व कोथिंबीर घालून खायला द्यावे.

या प्रकारात कणकेची पातळ पोळी लाटून कातण्याने मोठी शंकरपाळी कापून आमटीत सोडली तरी लवकर शिजतात.   खाताना वरणात ही फळं कुस्करून खायची पद्धत आहे. रात्रीच्या जेवणात हा एकच पदार्थ पोटभरीचा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT