vastu tips benefits of alum esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: तुमच्या घरातील अनेक वास्तूदोष दूर करण्याच काम करते तुरटी...

तुम्हाला माहिती का घरातल्या दररोजच्या वापरातल्या छोट्या छोट्या वस्तू आणि स्वयंपाकघरात वापरात येणारे काही घटकांच्या मदतीने अनेक प्रकारचे वास्तूदोष दूर केले जातात.

सकाळ डिजिटल टीम

Benefits of Alum: वास्तुशास्त्रात फक्त दिशा आणि त्यांचे महत्त्वच सांगितलेले नाही, तर तुमच्या घरातचं उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या मदतीने घरातील वास्तुदोष कसे दुर केले जाऊ शकतात याचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तुम्हाला माहिती का घरातल्या दररोजच्या वापरातल्या छोट्या छोट्या वस्तू आणि स्वयंपाकघरात वापरात येणारे काही घटकांच्या मदतीने अनेक प्रकारचे वास्तूदोष दूर केले जातात.

आज आपण पाहणार आहोत, पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीच्या सहाय्याने वास्तूदोष दूर कसे करता येतील...

चला तर मग जाणून घेऊ या सविस्तर माहिती

1) तुम्हाला घरातील आर्थिक ओढाताण आपोआप कमी होईल.

ज्योतिषी आणि वास्तूतज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही घरात योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला तुरटी ठेवली तर यामुळे तुमच्या घरातील वास्तू दोष तर दूर होतातच शिवाय आर्थिक समस्यांचे देखील बहुतांशी निराकरण होते. तुरटी ही बहुतांश घरात असतेच अन् जर नसली तरी ती अगदी सहजपणे बाजारात उपलब्ध होते.

2) तुरटी नेमकी घरात कुठे ठेवावी ?

वास्तुशास्त्रात असं सांगितल जात की, तुमच्या घराच्या दारा-खिडक्यांमधून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते. म्हणून तुरटीचे काही तुकडे तुम्ही घराची खिडकी किंवि दरवाज्यांजवळ ठेवू शकता. ज्या घरांजवळ जुनाट पडकी घरं किंवा एखाद्या घराचा ढिगारा पडलेला असेल, त्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात तयार होते. जर तुम्ही तुमच्या घराच्या दारांवर आणि खिडक्यांवर तुरटी ठेवाल तर ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. जर तुमच्या घराजवळ एखादं स्मशान किंवा कब्रस्तान असेल तर तुम्ही हा तुरटीचा प्रयोग हमखास करुन बघा. तुरटीचे खडे हे काचेच्या प्लेटमध्ये ठेवणे योग्य असल्याचे म्हटले जाते. आणि हो ही तुरटी दर एका महिन्यानंतर आठवणीने बदल चला.

3) तुम्ही तुमच्या घराच्या बाथरुममध्ये देखील तुरटी ठेवावी.

नियमितपणे घराच्या बाथरुममध्येदेखील एका वाटीत तुरटी ठेवायला हवी आणि तिलाही दर महिन्याला बदलत राहावे. बाथरुममध्ये जे दूषित पदार्थ असतात, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघते. बाथरुममध्ये तुरटी ठेवल्यास या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो.

4) तुरटी घरातील धनलक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यास मदत करते.

कधी पैशांची चणचण भासूच नये आणि पैशावाचून कुठलं काम अडू नये असं कोणाला वाटणार नाही. तुरटी तुमची ही समस्या दूर करू शकते. तुम्हाला केवळ तुरटी एका काळ्या कापडात ठेवायची आहे. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तुरटी काळ्या कापडात बांधून ठेवा. ती अशा प्रकारे ठेवा की बाहेरून येणाऱ्याला ती दिसणार नाही.या तुरटीमुळे तुमच्या घरात सदैव धनलक्ष्मी प्रसन्न राहिल आणि त्यामुळे घरात पैसा टिकवून राहिल.

4) कर्जातुन तुमची मुक्तता होईल.

तुरटीचे पाच तुकडे घ्या आणि ते सहा निळ्या फुलांसही एका काळ्या कापडात बांधून नेहमी आपल्या खिशात ठेवा. असं करण्याने रस्त्यातल्या प्रेतबाधेपासून तुमचं रक्षण होईल आणि तुमचा खिसाही कायम पैशांनी भरलेला राहील. तुरटी खायच्या पानात बांधून खिशात ठेवणंही चांगलं असं म्हटलं जातं.असे केल्याने तुमच्या डोक्यावरील कर्जाचा भार हळूहळू कमी होत जाईल ,हो पण तुम्हाला त्यासाठी मेहनत करावी लागेल हेही तितकंच खर बर का..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT