Vastu Tips For Office Table Sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: ऑफिसच्या टेबलवर आरसा ठेवणं शुभ कि अशुभ? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Vastu Tips For Office Table: वास्तुनुसार ऑफिस टेबलवर आरसा ठेवणे शुभ मानले जाते. पण काही नियमांचे पालन केले पाहिजे.

पुजा बोनकिले

vastu tips can we keep mirror office desk

अनेक लोक ऑफिस टेबलवर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवत असतात. तर काही लोकांना ऑफिस टेबलवर आरसा ठेवण्याची आवड असते. विशेषतः महिला किंवा मुली, परंतु तुम्हाला माहिती आहे का की ऑफिसच्या डेस्कवर आरसा ठेवणे योग्य आहे की नाही. चला तर मग जाणून घेऊया ऑफिस टेबलवर सारसा ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात कोणते नियम सांगितले आहे.

ऑफिस टेबलवर आरसा ठेवणे योग्य ?

वास्तुशास्त्रानुसार ऑफिस टेबलवर आरसा ठेवणे शुभ मानले जाते. पण काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ऑफिस टेबलवर नेहमी मध्यम आकाराचा आरसा ठेवावा. आरसा खूप लहान नसावा किंवा खूप मोठा नसावा.

जर तुम्हाला तुमच्या ऑफिस टेबलवर आरसा ठेवायचा असेल तर नेहमी असा आरसा ठेवा ज्याची मागची बाजू निळी असेल. ऑफिस टेबलवर काळी किंवा इतर रंगीत काच कधीही ठेऊ नका. यामुळे प्रगतीच्या मार्गात अडथळा येतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.

जर तुम्हाला तुमच्या ऑफिस टेबलवर आरसा ठेवायचा असेल तर लक्षात ठेवा की तुमची प्रतिमा आरशात दिसणार नाही अशा पद्धतीने टेबलवर ठेवावे. कारण आरसा आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा आपल्यात ओढण्याचे काम करते.

अशा वेळी तुमची प्रतिमा आरशात दिसली तर नकारात्मकतेचा तुमच्यावर परिणाम होतो आणि त्याच वेळी तुमच्या कामातही व्यत्यय येतो. तुमच्या यशाचे फळ तुम्हाला मिळणार नाही आणि तुमच्या कामात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

ऑफिस टेबलवर आरसा ठेवताना लक्षात ठेवा की आरशाजवळ जास्त सामान ठेऊ नका. आरशाजवळ नेहमी स्वच्छता ठेवावी. ऑफिस टेबलवर नेहमी गोल आरसा ठेवावा. ऑफिस टेबलवर चौरस, आयत यासारख्या इतर कोणत्याही प्रकारचे आरसे ठेऊ नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT