vastu tips for personal things sharing 
लाइफस्टाइल

Vastu Tips : इतरांच्या 'या' 5 वैयक्तिक गोष्टी चुकूनही वापरू नका, अडचणीत येऊ शकाल..

वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांची देवाणघेवाण अत्यंत अशुभ असते.

सकाळ डिजिटल टीम

वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांची देवाणघेवाण अत्यंत अशुभ असते.

Vastu Tips : अनेकदा तुम्ही असं पाहिलंय की, काही लोकांना दुसऱ्यांचा वस्तू मागून वापर करणे आवडते. अनेकांना ही सवय असते. मात्र याउलट काही लोक असेही असतात जे आपल्या वस्तू इतरांना वापरण्यासाठी देतात. वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांची देवाणघेवाण अत्यंत अशुभ असते.

वास्तू शास्त्रानुसार, इतरांच्या काही गोष्टी वापरल्याने त्यांचे एखादे संकट तुमच्याकडे येऊ शकते. आम्ही तुम्हाला अशाच काही पाच महत्वाच्या गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या कधीही कोणाशीही शेअर करू नका.. खालीलप्रमाणे आहेत त्या गोष्टी...

अंगठी

ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, रत्न किंवा धातूपासून बनवलेली इतरांची कोणतीही अंगठी तुम्ही घातली तर तुमच्या समस्या वाढू शकतात. आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या बाबी बोटांच्या स्थानाशी संबंधित असतात. म्हणूनच दुसऱ्याची अंगठी मागवून कधीही परिधान करू नका. ते अडचणीचे कारण ठरु शकते.

घड्याळ

वास्तूशास्त्रानुसार, आपण कधीही इतरांचे घड्याळ मागून आपल्या हातात घालू नये. घड्याळ मानवी वेळेशी जोडलेले आहे. असे म्हटंले जाते की, इतरांचे घड्याळ मागून आपल्या हातात घातल्याने त्यांच्या अशुभ काळाचा आपल्या जीवनावर परिणाम करुन लागतो. त्यामुळे घड्याळ घालताना काळजी घ्या.

हातरुमाल

ज्योतिषशास्त्र सांगते की, आपण कधीही आपला हातरुमाल इतरांसोबत शेअर करू नये. हे आरोग्यासाठी आजिबात अनुकूल नाही. वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की, एकमेकांसोबत रुमाल शेअर केल्याने नात्यात कटुता निर्माण होते.

कंगवा

तुमचे केस नीट करण्यासाठी किंवा विंचरण्यासाठी कधीही दुसऱ्याचा कंगवा वापरू नका. ज्योतिषशास्त्रात हे अशुभ मानले जाते. अगदी डोक्यात किंवा केसात वापरलेली कोणतीही गोष्ट आपण एकमेकांशी शेअर करू नये, असंही हे शास्त्र सूचवते.

कपडे

दुसऱ्यांनी घातलेले किंना त्यांच्या शरीराराला स्पर्श केलेले कपडे घालणेही ज्योतिषशास्त्रात चुकीचे मानण्यात आले आहे. इतरांचे कपडे परिधान केल्याने एखादी अशुभ घडना घडू शकते त्यामुळे आपण असे करणे टाळले पाहिजे. तुम्हाला जर अशी सवय असेल तर ती सवय तात्काळ बदला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT