Vastu Tips: Sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: तांदळाच्या 'या' उपायांनी आर्थिक संकटातून मिळेल सुटका

Vastu Tips: तांदळाला अक्षता असेही म्हणतात. ज्योतिष शास्त्रात तांदळाचे अनेक प्रकारचे उपाय सांगितले आहेत जे मानवी जीवनासाठी फलदायी ठरतात आणि जीवनात आनंद आणतात.

पुजा बोनकिले

Vastu Tips: हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पुजेला खुप महत्व आहे. मान्यतेनुसार देवतांची मनोभाव पुजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात. पुजाथाळीमध्ये देखील अनेक गोष्टींचा समावेश असतो. यामध्ये तांदळाचाही समावेश असतो. पुजेमध्ये तांदूळाला खास महत्व आहे. वास्तूशास्त्रानुसार तांदळाचा उपाय केल्यास अन्न आणि पैशाची समस्या दूर होते.

असे मानले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होतो तेव्हा त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवून कावळ्यांना खाऊ घालावी. हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.

जर तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर आणि त्यात यश मिळत नसेल तर हा उपाय नक्की करून पाहावा. आठवडाभर कावळ्यांना गोड भात खायला द्यावा. असे केल्याने नोकरी मिळण्याची शक्याता जास्त असते.

जर आयुष्यात अन्न आणि पैशाची कमतरता भासत असेल तर एका मोठ्या भांड्यात तांदूळ ठेवा आणि त्यावर अन्नपुर्णा देवी ठेवा. असे मानले जाते की असेल केल्याने व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात. याशिवाय कुंकुसोबत तांदूळ अर्पण केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात.

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शिवलिंगासमोर तांदूळ घेऊन ओम नम: शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर मुठभर तांदूळ शिवलिंगाला अर्पण करा आणि उरलेले तांदूळ एखाद्या गरीबाला द्या. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतील आणि धनलाभ होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: १११ वर्षांच्या आजींनी केले मतदान; तुमचं काय?

Sharad Pawar: हाय होल्टेज ड्रामा! मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या नेत्याला जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Shrinivas Pawar: "भाऊ अन् मुलगा यांच्यामध्ये मी शरद पवारांच्या बाजूने..."; श्रीनिवास पवारांचं मत, दादांना धक्का बसणार?

विकासाचे मारेकरी कोण अन् वारकरी कोण? मतदानाच्या दिवशी सूचक ट्विट; 'भाईं'नी चेंडू जनतेकडे पाठवला, काय म्हणाले?

व्हा सज्ज! Lionel Messi १४ वर्षांनंतर पुन्हा भारतात येतोय, अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा दौरा

SCROLL FOR NEXT