Vastu Tips : घर, ऑफिस किंवा दुकानात साफसफाईसाठी झाडूचा वापर केला जातो. हिंदू धर्मात झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले आहे. त्यामुळे झाडू वापरल्यानंतर काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर तुम्ही नाराज होऊ शकता आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते.
वास्तूशास्त्रात झाडू आणि साफसफाईबाबत काही गोष्टी नियम आहेत. असं म्हटलं जातं की. झाडूचा वापर कसा करावा हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. पण झाडूच्या बाबतीत आपण अशा काही चुका करतो.
ज्यामुळे वास्तूशास्त्रानुसार आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. झाडूमध्ये लक्ष्मी म्हणचे संपत्ती आणि समृद्धी असते.
वास्तूनुसार झाडू आणि मोप घरात न ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. वास्तुशास्त्रानुसार झाडू आणि मोप कोणत्या दिशेला ठेवावेत. वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या घरात, स्वयंपाकघर आणि बेडरूममध्ये झाडू ठेवू नये. घराच्या उत्तर-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला झाडूचा मोप ठेवा. झाडू ईशान्य किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवू नये.
काशी येथील अभ्यासक आणि ज्योतिषी स्वामी कन्हैया महाराज यांनी सांगितले की, झाडू ठेवण्यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे. झाडू वापरल्यानंतर कधीही उभा ठेवू नये. यामुळे जीवनात अडचणी येऊ शकतात.
ज्योतिषी स्वामी कन्हैया महाराज यांच्या मते झाडू धन आणि ऐश्वर्य देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते, म्हणून झाडूला कधीही पायाने स्पर्श करू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊन घरात नाराज होऊ लागते. झाडू पायाला लागला तर लक्ष्मीमातेची माफी मागावी.
झाडू खरेदी करण्याचेही काही नियम आहेत. त्यापैकी एक म्हणजे झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा यासाठी काही वार निश्चित केलेले आहेत. कोणत्याही दिवशी बाजारात गेलो आणि झाडू खरेदी केला असे करू नका. तर, झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस शुक्रवार आणि बुधवार आहे. याशिवाय झाडू नेहमी दक्षिण दिशेला ठेवावा.
तर रविवार आणि मंगळवारी झाडू खरेदी करू नका. यामुळे माता लक्ष्मी रागावते. तसेच झाडू कोणालाही दिसणार नाही अशा जागी ठेवावा.
मुलीला विदाईत झाडू देऊ नका
झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असला तरी मुलीच्या विदाईवेळी मुलीला झाडू देऊ नये. असे मानले जाते की, मुलीच्या निरोपात झाडू भेट दिल्यास तिचा आनंद हिरावून घेतला जातो. मुलीचं घर आणि संसार कधीच सुखी नसतो. त्याचं आयुष्य दु:खाने भरलेलं असतं.
झाडू कधीही मारायचा नसतो - संध्याकाळी कधीही घरात झाडू मारू नका आणि तुमचा वापरलेला झाडू कोणालाही देऊ नका. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो.
झाडूला पाय लागला तर
वास्तुशास्त्रामध्ये झाडूबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत झाडूवर पाय पडतो, परंतु अशा परिस्थितीत लागलीच झाडूच्या पाया पडाव्या. झाडूवर पाय ठेवणे हा लक्ष्मीचा अपमान आहे. यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
जुना झाडूचं काय करावं - घरामध्ये जुने आणि तुटलेले झाडू वापरू नये असे मानले जाते. जुना झाडू शनिवार, अमावस्या किंवा होलिका दहनाच्या दिवशी बाहेर टाकावा. जुने तुटलेले झाडू घराबाहेर काढल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आणि नव्या झाडूमुळे सकारात्मक उर्जा घरभर परसते.
झाडू कधीही जोरात फेकू नये
झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे मानले जाते, म्हणून तो कधीही जोरात फेकू नये किंवा जोरात आपटून फेकू नये. झाडूचा अनादर होता कामा नये. झाडूचा अनादर करणे म्हणजे माता लक्ष्मीचा अनादर करणे असे म्हणतात. वापरल्यानंतर झाडू कधीही उभा ठेऊ नका. झाडूला नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.