परदेशात जाऊन शिक्षण घेणे किंवा नोकरी करणे कोणाला आवडणार नाही? बऱ्याच जणांचं हे ध्येय देखील असतं. आणि अनेकदा त्यांना ते ध्येय पूर्ण करता येत. आपल्या आजूबाजूचे लोकं शिक्षणासाठी म्हणून परदेशात जातात, आणि मग तिकडेच नोकरी करून करतात. आपल्यालाही तिकडे जायचे असते पण ऐनवेळी काही तरी बिघडते. काही वेळेस व्हिसा मिळत नाही म्हणून तर काही आणखीन कारण निघते, अशावेळेस ती व्यक्ती निराश होते. किंवा आपल्या नशिबातच नसेल म्हणू प्रयत्न करणे सोडून देते.
कदाचित तुमच्या बाबतीतही असेच काहीसे घडत असेल. तुम्हाला अनेक दिवसांपासून परदेशात जाण्याची इच्छा आहे, परंतु इच्छा असूनही तुमची इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला निराश किंवा दु:खी होण्याची गरज नाही.
वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे तुमच्या परदेश प्रवासाच्या योगाला बळ देतात, ज्यामुळे व्यक्ती सहज प्रवास करू शकते.
या दिशेला रूम निवडा
जर लवकरात लवकर परदेशात जायच असेल तर तुमची खोली ही घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला म्हणजे वायव्य कोपऱ्यात असावी. वायव्य ही चंचल दिशा मानली गेली आहे, जी नेहमी फिरत असते. यामुळे तुम्हाला परदेश प्रवासात मदत होईल.
हा उपाय करा
जर तुम्हाला वायव्य दिशेला राहणे शक्य नसेल. तर तुमच्या परदेश प्रवासाशी संबंधित कागदपत्रे जसे की पासपोर्ट, किंवा इतर कागदपत्रे या दिशेला ठेवा.
वायव्य दिशेला हे चित्र लावा
जर तुम्हाला तुमचा परदेश प्रवासाचा योग बळकट करायचा असेल तर वायव्य दिशेच्या भिंतीवर जहाज, सबमरीन किंवा विमान यांचे पेंटिंग लावा.
काम वाढवायचे असेल तर
जर तुम्हाला परदेशात जाऊन तुमच्या कामाची किंवा करिअरची चांगली गती वाढवायची असेल, तर तुम्ही ज्या खुर्चीवर आणि टेबलावर काम करता त्या टेबलावर विमानाचे एक छोटेसे मॉडेल ठेवा. या विमानाचा चेहरा वरच्या दिशेकडे म्हणजे ते विमान उडत आहे असा असावा. तसेच, तुम्हाला ज्या दिशेकडच्यादेशात जायचे असेल विमान तिथेच ठेवा.
आपल एक रूटीन ठेवा
असं म्हणतात की माणूस जे काही मनात ठरवतो, तेच त्याच्या आयुष्यात घडतं. त्यामुळे लवकरात लवकर परदेशात जायचे असेल तर सकाळी उठल्यावर सर्वप्रथम दोन मिनिटे त्या देशाचा विचार करा आणि तुमची परदेश यात्रा यशस्वी होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करा. जर तुम्ही हे प्रामाणिक मनाने केले तर तुम्हाला परदेशात जाण्याची शक्यता लवकरच निर्माण होईल.
हे देखील लक्षात ठेवा
जर तुमचे काम परदेश प्रवासाशी संबंधित असेल किंवा तुम्हाला परदेशात जायचे असेल तर प्रयत्न करा की तुमची कोणतीही कागदपत्रे आणि वैयक्तिक वस्तू जसे की बॅग इत्यादी कधीही नैऋत्य दिशेला ठेवू नका. त्याचबरोबर परदेश प्रवासात येणारे अडथळे दूर करायचे असतील तर आग्नेय दिशाही टाळणे चांगले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.