Chapati Vastu Shastra esakal
लाइफस्टाइल

Chapati Vastu Shastra: ताटात कधीच एकत्र वाढू नका तीन चपात्या? कारण...

घरातल्या सदस्यांनी जास्त खावं यासाठी ताट भरून वाढलं जातं. पण

Pooja Karande-Kadam

Chapati Vastu Shastra: जेवण करताना ते कसं वाढावं याबद्दल काही नियम आहेत. भाजी, चपाती आमटी कोणत्या दिशेला ठेवावी, पापड लिंबू असेल तर त्यांचीही जागा निश्चित केलेली असते. काही ठिकाणी ताट वाढताना भरगच्च वाढले जाते तर काही ठिकाणी ते समोरच्याला लागेल तसं वाढलं जातं.

काहीवेळा बाहेरील पाहुणे आले, किंवा घरातल्या सदस्यांनी जास्त खावं यासाठी ताट भरून वाढलं जातं. पण असं करणं चुकीच आहे. हिंदू धर्मात अशा समजुती खूप जोडल्या जातात. यामध्ये उपासना, उपवास, सण-उत्सव, दैनंदिन जीवन जसे झोपणे-जागणे, उठणे-बसणे, खाणे-पिणे असे नियम सांगितले आहेत.

जेवणाच्या ताटात 3 चपात्य़ा वाढणं शुभ नसतं. होय, तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की ताटात तीन चपाती देऊ नका, तीन लाडू देऊ नका, तीन पराठे देऊ नका, तीन सफरचंद खाऊ नका. प्रसादात तीन फळेही दिली जात नाहीत. पण यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?

एका ताटात 3 चपाती ठेवणे हे मृत व्यक्तीसाठी अन्न मानले जाते. अनेकदा तेराव्याला मृत व्यक्तीसाठी काढण्यात येणाऱ्या नैवेद्यामध्ये ३ चपाती ठेवल्याचे तुम्ही पाहिले असेल. म्हणूनच जिवंत व्यक्तीच्या जेवणात 3 भाकरी किंवा चपाती देणे अशुभ मानले जाते.

3 क्रमांक अशुभ मानला जातो.

पूजेमध्येही 3 क्रमांक अशुभ मानला जातो. म्हणूनच हिंदू धर्मात खाण्यापिण्यात तीनच्या संख्येत काहीही दिले जात नाही किंवा घेतले जात नाही. त्याचबरोबर पूजा किंवा प्रसादातही 3 च्या संख्येने कोणतेही साहित्य दिले जात नाही, विज्ञान काय सांगते?

विज्ञानाच्या दृष्टीने अशी मोजदाद नाही, पण सामान्य माणसाला १ वाटी डाळ, भात आणि भाजीसोबत २ रोट्या पुरेशा असतात, पण त्यासाठी एक वाटी डाळीची गरज असते. सामान्य माणसाला पुरेसा आहे.

भात आणि भाजीसोबत दोन भाकरी खाल्ल्या तरी पुरे, अशा स्थितीत तिसरी भाकरी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT