Vat Purnima 2024 esakal
लाइफस्टाइल

Vat Purnima 2024 : यंदाच्या वटपौर्णिमेला घरासमोर काढा एकापेक्षा एक आकर्षक रांगोळ्या, तुमच्या अंगणाला येईल शोभा..!

Monika Lonkar –Kumbhar

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, मार्केटमध्ये सध्या वटपौर्णिमेची लगबग पहायला मिळतेय. वटपौर्णिमेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींनी बाजारपेठा सजल्या आहेत. हिंदू धर्मामध्ये या सणाला अतिशय महत्व आहे. यंदा ही वटपौर्णिमा २१ जूनला (शुक्रवारी) साजरी केली जाणार आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी सूवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात आणि देवाकडे हाच पती जन्मोजन्मी मिळावा अशी प्रार्थना करतात. हा दिवस शुभ असल्याने या दिवशी घराची सजावट केली जाते आणि अंगणात सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. यंदाच्या वटपौर्णिमेला तुम्ही देखील घराच्या अंगणात सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या काढू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या सोप्या रांगोळ्यांबद्दल.

पानाच्या डिझाईनची रांगोळी

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला अधिक महत्व असते. सूवासिनी आजच्या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत करून वडाच्या झाडाची पूजा करतात. त्यामुळे, या झाडाला विशेष महत्व असते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही घरासमोरच्या अंगणात वडाच्या पानाच्या डिझाईनची सुंदर आणि सोपी रांगोळी काढू शकता.

Vat Purnima rangoli

त्यासाठी वडाच्या पानाचा आधी आकार काढून घ्या. त्यानंतर, त्यात लहान आकारातील वडाचे झाड काढून किंवा केवळ तुमच्या आवडीचे रंग भरू शकता. शक्यतो हिरव्या रंगाचा वापर करा. त्यानंतर, वटपौर्णिमा असे रांगोळीत काढून तुमची रांगोळी पूर्ण करा. बाजूने मेणबत्ती किंवा हळदी कुंकवाच्या रंगांचा वापर करून रांगोळी सजवा.

मंगळसूत्र स्पेशल रांगोळी

वटपौर्णिमेच्या दिवशी सूवासिनी वटपौर्णिमेचे व्रत करतात. सोळा श्रृंगार करतात. या श्रृंगाराला विशेष महत्व आहे. या श्रृंगाराला दर्शवणारी मंगळसूत्राची स्पेशल रांगोळी तुम्ही वटपौर्णिमेला काढू शकता. त्यासाठी गोल किंवा चौकोन काढून त्यात मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, गळ्यातले, वडाचे पान आणि नथ देखील काढू शकता. त्यासाठी तुम्ही या फोटोतील रांगोळी पाहू शकता.

Vat Purnima rangoli

वटपौर्णिमेची सोपी रांगोळी

वटपौर्णिमेच्या दिवशी कामांची खूप गडबड असते. त्यामुळे, या गडबडीमध्ये महिलांना रांगोळीला फार वेळ देता येत नाही. खास त्यांच्यासाठी अशी कमी वेळेत होणारी ही सोपी आणि आकर्षक रांगोळी तुम्ही काढू शकता. त्यासाठी तुमच्या सोयीप्रमाणे गोल आकार काढून त्यात वटपौर्णिमा असे लिहा किंवा या फोटोप्रमाणे त्यात वडाचे झाड काढून बाजूने आवडीची डिझाईन काढा. त्यानंतर, तुमच्या आवडीचे रंग गोलाकारात भरा आणि छानशी नथ काढा. आता तुमच्या आवडीप्रमाणे रांगोळी सजवा.

Vat Purnima rangoli

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT