Vat Purnima 2024 esakal
लाइफस्टाइल

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेला झटपट मेकअप करून, मस्त तयार व्हायचंय? मग, 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

Monika Lonkar –Kumbhar

Vat Purnima 2024 : भारतामध्ये विविध प्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सणांपैकीच एक असलेला सण म्हणजे वटपौर्णिमा होय. हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा या सणाला विशेष असे महत्व आहे. ज्येष्ठ पक्षातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा वटपौर्णिमेचा सण २१ जून (शुक्रवारी) ला साजरी केली जाणार आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी सूवासिनी वटसावित्रीचे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वटसावित्रीचे व्रत करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. ही पूजा झाल्यानंतर सूवासिनी उपवास सोडतात. या सणाच्या दिवशी महिला साजशृंगार करतात. नवीन साडी नेसतात आणि छान मेकअप करतात.

यंदाच्या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सुद्धा झटपट मेकअप करून तयार व्हायच असेल तर त्यासाठी काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात त्या टिप्स.

सर्वात आधी चेहरा स्वच्छ करा

चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी तुम्ही सर्वात आधी चेहरा स्वच्छ करणे गरजेचे आहे.  त्यासाठी चेहरा तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या क्लिंझरने धुवा किंवा फेसवॉशचा वापर करा.

प्रायमर लावा

चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेवर सर्वात आधी प्रायमर लावा. यामुळे, तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल आणि मेकअप छान प्रकारे सेट होईल. जर तुमच्याकडे प्रायमर नसेल तर, तुम्ही मॉईश्चरायझर लावून त्यावर बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम लावू शकता.

फाऊंडेशन

चेहऱ्यावर प्रायमर लावल्यानंतर तुम्ही त्वचेवर फाऊंडेशन लावू शकता. परंतु, तुमच्या त्वचेला सूट होणारे फाऊंडेशन लावायला विसरू नका.

कन्सिलर

चेहऱ्यावर फाऊंडेशनचा बेस लावल्यानंतर आता तुम्ही कन्सिलर लावू शकता. जर तुमच्या चेहऱ्यावर डाग किंवा पिंपल्स असतील तर ते लपवण्यासाठी तुम्ही कन्सिलरचा वापर करू शकता. जर तुमचा चेहरा स्वच्छ असेल तर तुम्ही कन्सिलर लावणे टाळू शकता.

आयमेकअप महत्वाचा

चेहऱ्याचा मेकअप केल्यानंतर तुम्ही डोळ्यांचा मेकअप करू शकता. त्यासाठी, तुम्ही तुमच्या साडीच्या रंगाला आणि तुमच्या चेहऱ्याला सूट होणारे आयशॅडोज डोळ्यांना लावू शकता. डोळ्यांना शेप द्यायला विसरू नका.

लिपस्टिक अन् सिंधूर

डोळ्यांचा मेकअप केल्यानंतर तुम्ही ओठांना लिपस्टिक लावू शकता. शक्यतो महिला लाल रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची डार्क लिपस्टिक लावतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि साडीला सूट होणारी लिपस्टिक ओठांना लावू शकता. त्यानंतर, कपाळावर टिकली आणि केसांच्या भांगेत सिंधूर लावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT