Vat Purnima 2024 esakal
लाइफस्टाइल

Vat Purnima 2024: आधुनिक युगातली सावित्री, किडनी देऊन मरणाच्या दारातून परत आणले पतीचे प्राण

सकाळ डिजिटल टीम

Vat Purnima 2024:

कोल्हापुरात राहणारं एक सुखी जोडपं होतं. घरात असणारी दोन मुलं आणि सुखी संसार सुरू होता. पण, म्हणतात ना सर्व काही अलबेल असलेल्या संसाराही दृष्ट लागते. तसेच, या जोडप्याच्या बाबतीत झालं.

एक वाईट प्रसंग उद्भवला. तेव्हा सगळंच संपलं असं वाटलं. पण, ती डगमगली नाही. सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणणारी सावित्रीच होती ती. तिने पतीच्या जीवनासाठी वडाला मारलेल्या फेऱ्यांचे आशिर्वादच तिच्या पाठी होते. त्यामुळेच त्याचा जीव वाचला.

कोल्हापुरातल्या शुक्रवार पेठेत पद्मश्री आणि भरत शिराळे हे जोडपे राहते. भरत यांचे धान्याचे दुकान आहे. तर पद्मश्री गृहिणी आहेत. सुखाचा संसार १५ वर्ष सुरू होता. पण, २०१४ मध्ये अचानक संसाराचा सूरच बदलला. २०१४ मधील जून महिन्यात भरत यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू लागला. त्यावेळी त्यांचे वय होते केवळ ३८ वर्ष.

हाय बिपीचा त्रास झाल्याने कोल्हापुरातील एका रूग्णालयात त्यांना दाखल केले. आम्हाला वाटत होते बिपीचा प्रॉब्लेम असेल. पण, जेव्हा त्यांची तपासणी केली तेव्हा हातात आलेला रिपोर्ट धक्कादायक होता. माझ्या मिस्टरांच्या दोन्हा किडन्या निकामी झाल्याचे निदान तेव्हा झाले होते. माझ्या तर पायाखालची वाळूच सरकली होती. आता पुढे काय हा मोठा प्रश्न होता.

तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला धीर दिला आणि मिस्टरांचे किडनी प्रत्यारोपन करावे लागेल असे सांगितले. जेव्हा एकूणच खर्चाचे गणित मांडले तेव्हा खर्च झेपणार नाही असे वाटले. तेव्हा मी डॉक्टरांना सुचवले की माझी किडनी मिस्टरांना बसवता येऊ शकते का? माझी तयारी दर्शवली पण डॉक्टरांनी त्याच्यासाठी किडनी मॅच होणं गरजेचं आहे असं सांगितलं. तेव्हा सर्व टेस्ट करू आणि मग ठरवू असं डॉक्टर म्हणाले.

देवाच्या कृपेमुळे माझी व माझ्या पतीचा ब्लड ग्रूप एकच होता. त्यामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. साधारण १० वर्षांपूर्वी ही सुविधा कोल्हापुरात उपलब्ध नव्हती. त्यामुळे मुंबई, पुणे आणि चेन्नईला जावे लागणार होते. त्यानंतर आम्ही पुणे येथे रुबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांची भेट घेतली. त्यानंतर दोन ऑक्टोंबर 2014 मध्ये ऑपरेशन झाले.

दोन 21 ऑक्टोबर 2014 रोजी माझी एक किडनी काढून माझ्या मिस्टरांना बसवण्यात आली. आणि माझ्या मिस्टरांचे प्राण वाचले. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची प्रकृती चांगली आहे.

पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये आम्ही सव्वा महिना होतो. या सव्वा महिन्यात माझ्या डोळ्यासमोर आमचं संपूर्ण जीवनच जात होतं. माझी लग्नानंतरची वर्ष, सहावीत अन् नववीत असलेली मुलं, हे सतत डोळ्यासमोर येत होती.

आमचा गोडी गुलाबीने चाललेला संसार क्षणात कोसळेल की काय असं वाटतं होतं. पण कुठेतरी देव आहे. एक चमत्कार घडावा तसा देवाने संकटात पाडलं तसं यातून बाहेरही काढलं, हेच म्हणावं लागेल. 

तुमच्या निधनानंतर तुमचे अवयव जळून राखच होणार आहेत. त्याऐवजी तुम्ही त्यांचे दान केले तर कदाचित इतर लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी अवयव दानामध्ये सहभागी व्हावे, असे अवाहनही पद्मश्री यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT