लाइफस्टाइल

छोट्या देशमुखताईंची भन्नाट अ‍ॅक्टींग; एकदा हा Video नक्की पाहा

शर्वरी जोशी

आपण ज्या पद्धतीने वागतो, बोलतो त्याचा थेट परिणाम लहान मुलांवर होत असतो. त्यामुळे लहान मुलं कायम आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींचं अनुकरण करतांना दिसतात. यात अनेकदा भातुकलीचा खेळ खेळतांना लहान मुली अगदी आपल्या आई, आजी किंवा घरातील अन्य स्त्रियांप्रमाणे बोलतांना किंवा कृती करतांना दिसतात. अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या फॅनपेजवर  शेअर करण्यात आला आहे.

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही लहान मुलगी साडी नेसून अगदी मोठ्या स्त्रिया गप्पा मारतात त्या पद्धतीने गप्पा मारत आहे. कधी घरातील रितीरिवाज सांगतांना दिसते तर कधी घरातील कामाचा पसारा किती आहे याचं वर्णन करते. विशेष म्हणजे हे सारं सांगत असतांना तिचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे.

हा व्हिडीओ सगळ्यांच्याच पसंतीत उतरत असून चित्रा वाघ यांच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. 'बघा आपल्या या छोटूताई ला.......‬ ‪अप्रतिम अभिनय', असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये ही चिमुकली स्वत:ला देशमुख ताई म्हणते आणि घरच्या रितीपरंपरा नेमक्या कशा आहेत हे सांगते. त्यामुळे हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीत पडत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT