Virat Kohli
Virat Kohli esakal
लाइफस्टाइल

Virat Kohli : फिट राहण्यासाठी किंग कोहली कोणता डाएट प्लॅन फॉलो करतो? जाणून घ्या एका क्लिकवर

Monika Lonkar –Kumbhar

Virat Kohli : भारतीय संघाने नुकताच आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकून भारतीय चाहत्यांचे स्वप्न साकार केले आहे. १७ वर्षांपासून भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप जिंकता आलेला नव्हता. अखेर हा दुष्काळ संपवत भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेला कडवी झुंज देत विजयाला गवसणी घातली.

या वर्ल्ड कपविजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीने टी-20 मधून निवृत्ती घेतली. हे क्रिक्रेटप्रेमींसाठी धक्कादायक होते. वयाच्य ३५ व्या वर्षी विराट कोहलीने टी-20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर कित्येक चाहत्यांना अश्रू अनावर झाले असतील.

विराटचा जबरदस्त फॉर्म, त्याचा फिटनेस आणि डाएट याबद्दल चाहत्यांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. आज आपण विराट कोहलीचा खास डाएट प्लॅन नेमका काय आहे? ते जाणून घेणार आहोत.

विराटच्या डाएटमध्ये या घटकांचा असतो समावेश

विराट कोहलीने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या डाएट प्लॅनबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की, त्याच्या आहारात दोन कप कॉफी, मसूर, क्विनोआ, भरपूर पालक, भाज्या आणि नाचणी डोसा यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विराट बदाम, प्रोटिन बार आणि कधी कधी चायनीज फूड ही खातो. या डाएट प्लॅन आणि वर्कआऊटमुळेच विराट या वयातही फिट आणि सक्रिय राहतो.

विराटचे डाएट सिक्रेट

विराट कोहलीच्या डाएटमध्ये साखर आणि ग्लूटेनयुक्त पदार्थांचा समावेश नाही. यासोबतच विराट दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहतो. महत्वाची बाब म्हणजे विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा दोघे ही शाकाहारी आहेत. विराट कोहली भूक लागल्यावर केवळ ९०% अन्न खातो. यासोबतच तो वर्कआऊटवर जास्तीत जास्त भर देतो.

कोहली पितो अल्कालाईन वॉटर

विराट कोहली खास प्रकारचे पाणी पितो. ज्याला अल्कालाईन वॉटर असे म्हटले जाते. हे नैसर्गिकरित्या बायकार्बोनेटने समृद्ध असलेले पाणी आहे. याबद्दल विराटने सोशल मीडियावर ही सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : ''सगेसोयरे'च्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेत तथ्य नाही'', राज्य सरकारचा कोर्टात युक्तिवाद

Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ रथयात्रेला ७ जुलैपासून होणार सुरूवात, 1000 यज्ञांचे पुण्य देणाऱ्या यात्रेचे महत्त्व घ्या जाणून

Vasant More: तारीख ठरली! वसंत मोरेंचा या दिवशी होणार ठाकरे गटात प्रवेश; विधानसभेला मिळणार तिकीट?

Ambadas Danve: अंबादास दानवेंना निलंबनातून सूट; पाच दिवसांऐवजी...

Team India Arrival Live Updates : टीम इंडियाचा PM मोदींसोबतच्या 'त्या' भेटीचा व्हिडिओ आला समोर, रोहित-कोहली अन्...

SCROLL FOR NEXT