काही लोकांचे मित्र मंडळ खूप मोठे असते, तर काही लोकांना निवडक मित्र असतात.
लहानपणापासून कॉलेजपर्यंत आणि नंतर व्यावसायिक जीवनात आपले अनेक मित्र आहेत. आपण सर्व प्रकारच्या गोष्टी मित्रांसोबत शेअर करतो आणि ते आपल्याला आपल्या अडचणींमध्ये मदत करत असतात. आयुष्यात मित्र असणे खूप महत्वाचे आहे. काही लोकांचे मित्र मंडळ खूप मोठे असते, तर काही लोकांना निवडक मित्र असतात. नवीन कितीही मित्र आयुष्यात आले तरीही जुन्या मित्रांवर जास्तीचा विश्वास असतो. त्यामुळे 'ओल्ड इज गोल्ड' ही म्हण जुन्या मित्रांना चपखल बसते. (old friends meet is best)
आजच्या युगात, प्रत्येकजण धावपळीचे जीवन जगत आहे. प्रत्येकजण करिअर, जॉब, नोकरी, संसार अशा गोष्टींमध्ये गुंतला आहे. या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मित्रांना भेटणे कमी झालं आहे. बऱ्याचवेळा याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. ही गोष्ट पटणारी नाही मात्र हे खरं आहे. जुन्या मैत्रीचा मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. याबाबतचा एक अभ्यास समोर आला आहे. त्यासंदर्भात जाणून घेवूया..
जुन्या मित्रांच्या सहवासाने मानसिक आरोग्य सुधारते..
एका हेल्थ सर्वेच्या अहवालानुसार, अभ्यासातून समोर आलंय की, जुन्या मित्रांना भेटणे हे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. असे केल्याने लोकांची मानसिक स्थिती बर्याच प्रमाणात सुधारते. इतकंच नाही तर फोन कॉल, ईमेल किंवा टेक्स्टिंगचाही मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. कोरोना महामारीनंतर जुन्या मित्रांचे महत्त्व अधिक वाढले आहे. कोरोनामुळे बहुतांश लोकांना मानसिक आरोग्याच्या समस्यांमधून जावे लागले आहे. विशेषत: वृद्धांना या समस्यांना सर्वाधिक सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत लहानसहान गोष्टींमुळेही मानसिक आरोग्यावर ताण येतो मात्र हा स्ट्रेस कमी करण्यासाठी जुने मित्र हे उत्तम औषध आहे.
हा अभ्यास अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने (एपीए) प्रकाशित केला आहे. यामध्ये सुमारे 6000 लोक सहभागी झाले होते. या लोकांचा डेटा गोळा केल्यानंतर संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. यातून असे दिसून आले की, बऱ्याच काळापासून संपर्कात नसलेल्या जुन्या मित्रांशी बोलणे खूप आनंददायक आहे. बोलल्याने या दोन्ही बाजूच्या मित्रांचे भावनिक आणि मानसिक आरोग्य सुधारते आहे. लोकांमध्ये एकटेपणाची भावनाही आरोग्यासाठी धोकादायक मानली जाते. एकमेकांना भेटून आणि बोलूनही चिंता आणि नैराश्य खूप कमी होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.