Rakshabandhan esakal
लाइफस्टाइल

Rakshabandhan : रक्षाबंधनानिमित्त बहिणीला गिफ्ट द्यायचंय पण बजेट कमी आहे? हे आहेत 1500 रुपयांच्या आतील खास पर्याय

यंदा रक्षाबंधन 30 ऑगस्ट रोजी असून आता या सणाला फक्त दोन दिवसच शिल्लक राहिले आहेत

सकाळ डिजिटल टीम

Rakshabandhan : तुम्हाला तुमच्या बहिणींना खास आणि हटके गिफ्ट द्यायचं असेल पण बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी काही खास ऑप्शन्स घेऊन आलोय. यंदा रक्षाबंधन 30 ऑगस्ट रोजी असून आता या सणाला फक्त दोन दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अनेकजण भेटवस्तू खरेदी करण्यात व्यस्त आहेत. पण काहीजणांना आपल्या बहिणींना खास आणि हटके गिफ्ट द्यायचं असेल पण त्यांचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी काही खास ऑप्शन्स आम्ही आज तुम्हाला सांगत आहोत. यामध्ये स्मार्टवॉच TWS इअरबड्स असे खास गिफ्ट्स 1500 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मिळतील.

Boult W40 TWS

तर या यादीतील सर्वात पहिला ऑप्शन म्हणजे बोल्ट कंपनीचे नुकतेच लाँच झालेले Boult W40 TWS इअरबड्स. विशेष म्हणजे फक्त 899 रुपयांच्या लाँचिंग प्राईसमध्ये हे बड्स लाँच झाले असून गिफ्ट करण्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहेत. Boult W40 TWS इअरबड्समध्ये 13 मिमी ड्रायव्हर्स आहेत जे समाधानकारक बाससह स्पष्ट आणि भारी आवाज देतात. हे ब्लूटूथ 5.3 सह येत असून SBC आणि AAC कोडेक्सला सपोर्टेड आहेत. म्युझिकसह कॉलिंगसाठीही हा बेस्ट आहे. विशेष म्हणजे तुम्ही 48 तासांपर्यंतच्या बॅटरी लाइफसह दिवसभर म्युझिक ऐकू शकता.

Noise ColorFit Icon Buzz

तर या यादीतील दुसरा पर्याय म्हणजे Noise कंपनीची Noise ColorFit Icon Buzz ही स्मार्टवॉच असून फक्त 1399 रुपयांना येणारा हा देखील 1500 च्या आतील एक चांगला पर्याय आहे. यात हेल्थ फीचरसह स्पोर्ट्समोड आणि वॉईस असिस्टंटही सपोर्टेड आहे. विशेष म्हणजे या किंमतीत यात ब्लूटूथ कॉलिंगही दिलं गेलं आहे.

आणखी एक स्मार्टवॉचही या यादीत असून हे म्हणजे फायरबोल्ट कंपनीचं Fireboult Ninja 3 Plus हे स्मार्टवॉच आहे. 1.83 इंच इतका डिस्प्ले असणारा हे वॉच सध्या फक्त 1099 रुपयांना मिळत आहे. यातही दमदार बॅटरी लाईफसह 118 स्पोर्ट्समोड आणि बरंच काही कंपनीनं दिलं आहे.

Boat Airdopes 190

अगदी स्टायलिश पण कमी बजेट मध्ये येणारे बोट कंपनीचे हे Boat Airdopes 190 देखील एक चांगला बजेट ऑप्शन आहे. 1400 रुपयांना उपलब्ध या बड्समध्ये दमदार बॅटरीसह सुपर क्वॉलिटी साउंड आहे. विशेष म्हणजे याचा लूक फारच भारी असून यात कितीतरी भारी-भारी फीचर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT